शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या ‘ड्रेनेज’ घोटाळ््याची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या ड्रेनेज योजनेतील गैरव्यवहाराबाबत उपमहापौर गटाने केलेल्या तक्रारीची दखल घेत लोकायुक्तांनी गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत. शासनानेही महापालिका आयुक्तांकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविल्याने, अधिकाºयांचे धाबे दणाणले आहेत.सांगली व मिरज शहरांत गेल्या सहा वर्षांपासून ड्रेनेज योजनेचे काम सुरूआहे. मूळ योजना ११४ ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या ड्रेनेज योजनेतील गैरव्यवहाराबाबत उपमहापौर गटाने केलेल्या तक्रारीची दखल घेत लोकायुक्तांनी गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत. शासनानेही महापालिका आयुक्तांकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविल्याने, अधिकाºयांचे धाबे दणाणले आहेत.सांगली व मिरज शहरांत गेल्या सहा वर्षांपासून ड्रेनेज योजनेचे काम सुरूआहे. मूळ योजना ११४ कोटींची असताना जादा दराच्या निविदेमुळे ती १८० कोटींवर गेली आहे. त्यामुळे महापालिकेवर ६० कोटींचा अतिरिक्त बोजा पडला. ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ, भाववाढ देण्यात आली आहे. ठेकेदाराने नियम व अटींचा भंग करूनही महापालिका प्रशासन व सल्लागार एजन्सी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून त्याला पाठीशी घातले जात आहे. या योजनेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार उपमहापौर गटाचे नगरसेवक शेखर माने यांनी लोकायुक्तांकडे केली होती.याबाबत माने म्हणाले की, महाआघाडी व विद्यमान काँग्रेस सत्ताधाºयांनी नेहमीच ठेकेदाराला पाठीशी घातले. आता प्रशासन ठेकेदारावर मेहेरबान झाले आहे. ड्रेनेज योजनेचे काम झाल्याशिवाय त्याची बिले देऊ नयेत, असे ठरले असतानाही, गेल्या वर्षभरात ११ कोटीची बिले देण्यात आली आहेत. लोकायुक्तांकडे तक्रार केल्यानंतरही सहा ते सात कोटीची बिले ठेकेदाराला दिली गेली. महापालिकेच्या विशेष लेखापरीक्षणात पाईपचा अबकारी कर चुकविल्याबद्दल ठेकेदाराकडून एक कोटी ६० लाख रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. पण ही रक्कम त्याच्या बिलातून प्रशासनाने वसूल केली नाही. सांगली व मिरजेतील एकही वाहिनी प्रवाहित नसताना, ठेकेदाराला आतापर्यंत ९० कोटी रुपये देण्यात आले आहेत.ठेकेदाराकडे योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी सक्षम यंत्रणा नाही. मिरजेत तर पंपगृहच बंद ठेवल्याने मैलामिश्रित पाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. दोन्ही शहरातील पंपगृहांच्या जागा अजून निश्चित नाहीत. मलशुद्धीकरण केंद्राचे कामही पूर्ण झालेले नाही. शामरावनगरमधील ड्रेनेजचे काम बंद आहे. ठेकेदाराने वेळेत काम न केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाईची अट करारपत्रात आहे. जीवन प्राधिकरणने तीन ते सहा हजार रुपये दंड वसूल करण्याची शिफारस केली असतानाही महापालिका प्रशासनाकडून दंड वसूल केला जात नाही. केवळ फायली एका टेबलावरून दुसºया टेबलावरच फिरविल्या जात आहेत.मलशुद्धीकरण केंद्राचे सिव्हिल काम पूर्ण न होताच ठेकेदाराने यंत्रणा खरेदी केल्याने महापालिकेचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत. नियमबा' भाववाढ देऊन व दंडात्मक कारवाई न करता ठेकेदाराला सहकार्य व आर्थिक मदत करण्याचा महापालिका प्रशासन व जीवन प्राधिकरणच्या अधिकाºयांचा हेतू दिसून येतो. याबाबत लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन लोकायुक्त कार्यालयाने शासनाला ३० दिवसांत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.