शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

कडेगाव तालुक्यातील १७ गावांवर अन्याय

By admin | Updated: April 12, 2016 00:37 IST

शासनाचे दुर्लक्ष : दुष्काळग्रस्त यादीत समावेश नाही

प्रताप महाडिक -- कडेगाव -तालुक्यातील १७ गावांचा समावेश अद्याप दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत झालेला नाही. या गावांची खरीप हंगामातील पीक उत्पादनाची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. दुष्काळग्रस्तांच्या सर्व निकषास पात्र असतानाही या गावांवर अन्याय का, असा सवाल शेतकरी करत आहेत.कडेगाव तालुक्यातील सोनहिरा खोऱ्यातील सोनसळ, सोनकिरे, शिरसगाव, पाडळी, आसद, मोहित्यांचे वडगाव, देवराष्ट्रे, रामापूर, कुंभारगाव, शिरगाव, अंबक, चिंचणी या १२ गावांसह वांगी, शेळकबाव, हिंगणगाव (खुर्द), शिवणी, वडियेरायबाग ही गाव दुष्काळग्रस्त यादीत अद्यापही समाविष्ट झालेली नाहीत. कडेगाव तालुक्यातील उर्वरित ३९ गावांना शासनाने टंचाईग्रस्त घोषित करून ८ कोटींची मदत दिली आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु वंचित राहिलेली १७ गावे मात्र शासनाकडून मदतीची अपेक्षा करत आहेत. येथे खरीप नंतर रब्बी हंगामही वाया गेला. ताकारी योजनेचे पाणी येथे मिळत असले, तरी अद्यापही हजारो हेक्टर शेती योजनेच्या कालव्यापेक्षा उंच भागात आहे. यामुळे ही शेती योजनेच्या लाभापासूनही वंचित आहे. सध्या या १७ गावातील बहुतांशी विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. कडेगाव तहसीलदार कार्यालयाकडून खरीप हंगामामध्ये ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या गावांची अंदाजित यादी शासनाकडे हंगामाच्या मध्यावधीच्या दरम्यान दिली होती. यामध्ये या १७ गावांचा समावेश नव्हता. परंतु हंगाम संपल्यावर या गावांची खरीप पीक उत्पादन पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असल्याचे शासकीय आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. राजकीय नेते लक्ष घालणार?आमदार डॉ. पतंगराव कदम तसेच सत्ताधारी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख या दोन्ही नेत्यांनी लक्ष घालून या गावांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा येथील शेतकरी करत आहेत. राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरद लाड यांनी या १७ गावांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे. शेकापचे सरचिटणीस अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी कडेगाव तहसील कार्यालयासमोर काळी गुढी उभा करून या गावांवरील अन्यायाचा निषेध केला आहे.चिंचणीत कमी पाऊसकडेगाव तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद चिंचणी या भागात झाली आहे. तरीही हे गाव दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट नाही. यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. या गावातील खरीप, रब्बी हंगामातील पिके वाळून गेली आहेत.