शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

शिराळ्याच्या कोरोनावरील इंजेक्शनला अजूनही चाचणीच्या परवानगीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:28 IST

शिराळा : शिराळ्यात तयार होणाऱ्या कोरोनावरील इंजेक्शनला मानवीय चाचणीसाठी अजूनही परवानगीची प्रतीक्षा आहे. हे अँटिकोविड सिरम इंजेक्शन बनवणारी आयसेरा ...

शिराळा : शिराळ्यात तयार होणाऱ्या कोरोनावरील इंजेक्शनला मानवीय चाचणीसाठी अजूनही परवानगीची प्रतीक्षा आहे. हे अँटिकोविड सिरम इंजेक्शन बनवणारी आयसेरा बायोलॉजिकल कंपनी याबाबत ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया आणि आयसीएमआरकडे मान्यतेसाठी पाठपुरावा करत आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही हे इंजेक्शन प्रभावी ठरेल, असा दावा या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केला आहे.

चीनमध्ये प्रतिजैविकाच्या वापराने मृत्यूचे प्रमाण रोखण्यात यश आले आहे. त्याचाच वापर ही लस बनवताना केला आहे. सर्पदंश, रेबीज, धनुर्वात, घटसर्प, विंचूदंश या रोगांवरील प्रतिपिंडे (प्लाझ्मा) घोड्याच्या रक्तामध्ये त्या रोगाचे विष अथवा जंतू (मृत अथवा निष्क्रिय) टोचून बनवली जातात व रोग्याला दिली जातात. अशी औषधनिर्मिती गेल्या कित्येक दशकापासून होत आहे. ही थेरपी वापरून संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाने ‘आयसेरा’ने हे अँटिकोविड सिरम नावाचे इंजेक्शन बनवले आहे.

प्रतापराव देशमुख, दिलीप कुलकर्णी, नंदकुमार कदम, धैर्यशील यादव ‘आयसेरा’चे संचालक असून, हे इंजेक्शन तयार करायला मंजुरी मिळावी, यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्रालय, टास्क फोर्स आणि सिरम कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया आणि आयसीएमआरकडे ते मान्यतेसाठी पाठपुरावा करत आहेत.

आयसेरा कंपनीने या औषधाच्या मानवी चाचणीस परवानगी मागितली असली तरी, या कंपनीची ‘नॉलेज पार्टनर’ पुण्याची सिरम कंपनी आहे. सिरमच्या सहभागाशिवाय आयसेराच्या मागणीची दखल घेतली जाणार नव्हती. त्यातच अशा औषधांच्या निर्मितीसाठी देशभरात शंभरावर कंपन्यांनी मागणी केलेली आहे, असे त्यांनी सांगितले.

सप्टेंबर २०२० पासून हे इंजेक्शन तयार करण्यात येत आहे. ते अत्यंत कमी मात्रेमध्ये टोचले तरी याचा गुण येण्यास मदत होईल. वयस्कर व कमी प्रतिकारक्षमतेच्या रुग्णांनाही ते जीवनदायी ठरेल. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे गंभीर रुग्ण, प्रचलित औषधांना प्रतिसाद न देणारे रुग्ण यांच्यासाठी हे प्रभावी औषध ठरू शकेल. सध्या चार लाख लस तयार आहेत. मानवीय चाचणीची परवानगी मिळाल्यास महिन्यास पंधरा ते वीस लाख लस तयार करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इंजेक्शनचे फायदे

कोरोना रुग्ण कमीत कमी दिवसांत बरे होऊन घरी परतण्यासाठी हे इंजेक्शन सलाईनमधून द्यायचे आहे. त्यामुळे केवळ अत्यंत अत्यवस्थ असलेल्या रुग्णांनाच ऑक्सिजन व्हेंटिलेटरची गरज भासेल. याच्या वापरामुळे मृत्यूदर कमी होईल, असा विश्वास संचालकांनी व्यक्त केला.