शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बेदाणा उधळण थांबवण्यासाठी हवा बाजार समित्यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:26 IST

दत्ता पाटील तासगाव : बाजार समित्यांत होणाऱ्या सौद्यावेळी बेदाण्याची उधळणपट्टी करून कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारण्याचा उद्योग राजरोसपणे सुरू आहे. ...

दत्ता पाटील

तासगाव : बाजार समित्यांत होणाऱ्या सौद्यावेळी बेदाण्याची उधळणपट्टी करून कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारण्याचा उद्योग राजरोसपणे सुरू आहे. या उधळपट्टीची सगळी माहिती बाजार समित्यांकडे आहे. मात्र, अडत्यांशी असणारे लागेबांधे आणि आर्थिक हितसंबंध यामुळे याविरोधात सर्वांचीच गांधारीची भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या बेदाण्यातून अडते पैसे मिळवत असतील, तर तूट हवीच कशाला? असा सवाल शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. यावर सक्षम पर्याय अमलात आणला, तर तुटीची पद्धत बंद होईल. मात्र, त्यासाठी बाजार समित्यांनी सक्षम पुढाकार घ्यायला हवा.

बाजार समित्यांत बेदाणा सौद्यावेळी प्रत्येक बॉक्समधून दोन ते चार किलो बेदाण्याची उधळण होते. उधळलेला बेदाणा संबंधित अडते पुन्हा विक्री करून त्यातून कोट्यवधी रुपये मिळवितात. ‘लोकमत’ला मिळालेल्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना तूट दाखवून एका अडत्याला वर्षाला पंचवीस ते पन्नास लाख रुपये उत्पन्न मिळते.

तुटीतून शेतकऱ्यांना लुटण्याची पद्धत अनेक वर्षांपासून सुरू आहे. तुटीबाबत तक्रार केली, तर अडत्यांकडून पैसे वेळेत दिले जात नाहीत. बाजार समितीत शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून सत्तेच्या उबीला बसलेले सत्ताधारी शेतकऱ्यांची तक्रार नसल्याचे कारण सांगून कारवाई करत नाहीत. सत्तेतील अनेक बगलबच्च्चांसह अनेक संचालकांची अडत दुकाने आहेत. या अडत दुकानदार आणि व्यापाऱ्यांशी सत्ताधाऱ्यांचे लागेबांधे असल्यामुळे मुळावर घाव कोणीच घालत नाही. मात्र, बाजार समितीने ठरवले, तर तुटीची पद्धत मुळापासून बंद करणे सहज शक्य आहे.

बाजार समितीतून होणारी लूट आकडेवारीसह चव्हाट्यावर आणल्यानंतर अनेक बेदाणा उत्पादकांनी ‘लोकमत’कडे शेतकऱ्यांच्या लुटीचे प्रकार सांगितले. व्यापाऱ्यांकडून सुरू असलेल्या सावकारीचे अनेक कारनामे आहेत. याविरोधात ‘तूट बंद, लूट बंद’ असा नारा देत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.

चौकट :

हवा आहे पर्याय; पण अमलात कोण आणणार?

बेदाणा सौद्यात होणारी लूट थांबवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. सौद्यावेळी उधळलेला बेदाण्यावर शेतकऱ्यांचाच हक्क आहे. मुळातच केवळ माल पाहून पुन्हा तो बॉक्स सील केल्यास तूट होणार नाही. हे शक्य नसल्यास उधळण झालेल्या बेदाण्यावर अडत्यांचा हक्क राहू नये, यासाठी बाजार समितीने ठोस धोरण अमलात आणायला हवे. सौद्यावेळी उधळण झालेला बेदाणा बाजार समितीने ताब्यात घेऊन त्याची विक्री करायला हवी. त्यातून येणारे पैसे संबंधित शेतकऱ्यांना देता येणे शक्य आहे किंवा या पैशांतून बाजार समित्यांना शेतकरी हिताची योजना राबविणेही शक्य आहे. उधळण करून काही फायदाच होत नसेल, तर अडत्यांकडून उधळण आपोआपच थांबू शकते. पर्याय आहेत; पण लुटीत सगळेच भागीदार असल्याने अमलात आणणार कोण? असा प्रश्न आहे.