शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रप्रस्थ पतसंस्थेस २ कोटी १० लाखांचा नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:25 IST

इस्लामपूर : येथील इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्थेस संपलेल्या आर्थिक वर्षात २ कोटी १० लाख रुपये इतका ढोबळ नफा झाला ...

इस्लामपूर : येथील इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्थेस संपलेल्या आर्थिक वर्षात २ कोटी १० लाख रुपये इतका ढोबळ नफा झाला आहे, तर ६१ लाख ४४ हजार रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती अध्यक्ष युवराज सूर्यवंशी यांनी दिली. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील या संस्थेचे संस्थापक असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची यशस्वी घोडदौड सुरू आहे.

कोरोनासारख्या संकटातही संस्थेने कर्जदार, ठेवीदार, सभासद आणि कर्मचाऱ्यांच्या उत्तम सहकार्याने अतिशय चांगले काम केल्याने संस्थेचा एन.पी.ए. शून्य टक्के राहिला आहे. संस्थेकडे ५५ कोटी २ लाख रुपयांच्या ठेवी आहेत, तर ४१ कोटी ९९ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. भागभांडवल १ कोटी ६२ लाख रुपये, संस्थेची अन्य बॅँकांतील गुंतवणूक ६ कोटी २ लाख रुपये असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.

इंद्रप्रस्थच्या इस्लामपुरातील मुख्य शाखेसह सांगली, आष्टा, पलूस, मणेराजुरी आणि शिराळा येथे शाखा कार्यरत आहेत. संस्थापक-मार्गदर्शक दिलीपराव पाटील यांनी शाखा विस्ताराचा निर्णय घेतल्याने आगामी काही महिन्यात इस्लामपूर बसस्थानक परिसर, लाडेगाव फाटा, तासगाव, भिलवडी येथे नवीन चार शाखा कार्यान्वित होणार असल्याचे सूर्यवंशी म्हणाले.

यावेळी उपाध्यक्ष विश्वास धस, संचालक मोहनराव शिंदे, विजयकुमार पाटील, सुहास घोरपडे, जनरल मॅनेजर राजाराम कटारे उपस्थित होते.