शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रियांवर वाढते अत्याचार चिंताजनक

By admin | Updated: February 6, 2017 01:13 IST

विद्या बाळ : तासगाव महिला महविद्यालयामध्ये चिंतन शिबिर

तासगाव : स्त्रियांवरील वाढते अत्याचार हे चिंताजनक असून, हे अत्याचार फक्त स्त्रियांबद्दल प्रश्न निर्माण करीत नसून, एकूणच पुरुषी व्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण करत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी व्यक्त केले. तासगाव येथील महिला शिक्षण शास्त्र महाविद्यालय, अंनिस व अक्षर सखी मंच आयोजित एक चिंतन - आणखी एक बलात्कार, आणखी एक खून, पुढे काय? या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. भिलवडी येथील स्त्री अत्याचारग्रस्त पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी आल्या असता, त्यांचा तासगाव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.जातीव्यवस्थेने वेदनेचीदेखील जात ठरवली असून, बळी जाणारी स्त्री आणि दोषी पुरुष कोणत्या जाती धर्माचा आहे, याला देखील आता मोल येत असून, स्त्री अत्याचाराला जात धर्म नसतो, हे त्यांनी ठासून सांगितले. यावेळी कोणत्याही दबावाला बळी न पडता निरपेक्षपणे काम केले याबाबत पोलिस प्रशासनाचे अभिनंदन केले. सध्याच्या जगात स्त्री-पुरुषांना व्यवस्था समानतेची व माणूसपणाची वागणूक दिली जात नसल्याने समाजाची अधोगती होत आहे. भांडवली व्यवस्थेने स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणूनच बघितले आहे. यामुळे समाजात महिलांकडे विकृत दृष्टिकोनातून बघण्याची पध्दत वाढीस लागली असल्याचे मतही विद्याताई बाळ यांनी व्यक्त केले. पुरुष उवाच आणि मिळून साऱ्याजणी या मासिकाच्या संपादिका डॉ. गीताली मंदाकिनी, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. बाबूराव गुरव, विजय कराडे, सुहासिनी कराडे, डॉ नामदेव कस्तुरे, डॉ सोनिया कस्तुरे, प्राचार्य यांची प्रमुख उपस्थिती होतीकार्यक्रमाचे स्वागत डॉ. कविता जाधव व छायाताई खरमाटे यांनी केले. फारूक गवंडी यांनी प्रास्ताविक, तर हेमलता बागवडे यांनी आभार मानले. गौरी फोजदार यांनी सूत्रसंचालन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंनिसचे अमर खोत, कुंदन सावंत, अशोक पाटील, भास्कर सदाकळे, पांडुरंग जाधव, शरद शेळके, संजय पाटील यांच्यासह अक्षर सखी मंचच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)