शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

वाढला पारा.. घामाच्या धारा!

By admin | Updated: April 14, 2017 22:16 IST

पारा @ 4० अंश : कऱ्हाडकर घामाघूम; उन्हापासून संरक्षणासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या

कऱ्हाड : एप्रिल सुरू होताच कऱ्हाड तालुक्यात उन्हाळ्याच्या प्रकोपाची सुरुवात झाली आहे. सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचा तडाखा सुरू होत आहे. तालुक्याच्या डोंगरी विभागातील पाणवठे पूर्णपणे आटण्याच्या मार्गावर आहेत. उष्माघातासारख्या उन्हाळी आजारांमुळे दवाखान्यांमधील रुग्णांची संख्या वाढली आहे. यावर्षी तालुक्यातील पाण्याच्या स्त्रोतांची अवस्था गेल्या वर्षी पेक्षा बऱ्यापैकी असली तरी लोकांमध्ये पाणी बचतीबाबत जागृती करण्याची गरज आहे.काही वर्षांच्या तुलनेत २०१६ मध्ये मान्सूनचे प्रमाण समाधानकारक राहिले होते. त्यामुळे तालुक्यातील नद्यांसह, पाझर तलाव व इतर पाणवठे ओसंडून वाहिले होते. परंतु अजूनही अनेक गावांमधील जलसंधारणाची कामे अपूर्ण असल्यामुळे पावसाळ्यात झालेला पाणीसाठा उन्हाळा संपेपर्यंत टिकून राहिलच याची खात्री देता येत नाही. कृष्णा नदीकाठच्या गावांना पाणीटंचाई फारशी जाणवत नसते. परंतु दक्षिणच्या डोंगरी विभागातील तसेच मसूर पूर्व भागातील अनेक गावांमध्ये प्रत्येक वर्षी पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे प्रत्येक वर्षी टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक मान्सूनमुळे यावर्षी टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होण्याची शक्यता होती. परंतु मार्चच्या पहिल्या पंधरवड्यानंतर अनेक गावांमधून पाण्याच्या टँकरची मागणी वाढू लागली आहे.चांगल्या मान्सूनमुळे यावर्षी तालुक्यात विक्रमी थंडीची नोंद करण्यात आली. जानेवारी महिन्यात तर किमान तापमानाचा पारा अनेक वर्षांनंतर आठ अंश सेल्सिअसपर्यंत उतरला होता. अगदी जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत थंडीची तीव्रता जाणवतच होती. सध्या एप्रिल महिन्याच्या मध्यांतरातच कमाल तापमानाची पातळी ३९, ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचली आहे. सकाळी दहा ते अगदी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडताना दिसू लागले आहेत. उन्हाळी फळे समजल्या जाणाऱ्या द्राक्षे, कलिंगड, काकड्या यांचीही बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. कऱ्हाड शहर तसेच तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर कोल्ड्रिंक्सचे गाडे जागा व्यापू लागले आहेत. कृष्णा घाटावरील प्रीतिसंगमावर पोहण्यासाठी तसेच येथील बागेत फिरायला येणाऱ्यांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढली आहे. अगदी गरजेचे असेल तरच दुपारच्या वेळी लोक घरातून बाहेर पडताना दिसत आहेत. महिला, महाविद्यालयीन तरुणींबरोबरच तरुण वर्गही दुचाकी चालवताना तोंडाला स्कार्फ बांधूनच बाहेर पडताना दिसत आहे.प्रामुख्याने कृष्णा आणि कोयना नदीपासून दूर असणाऱ्या गावांमध्ये पाणी टंचाईची चिन्हे दिसू लागली आहेत. पाझर तलावांमधील पाणी पातळीही घटू लागली असल्यामुळे जून महिन्यापर्यंत म्हणजेच पावसाळा सुरू होईपर्यंत पाणीसाठा पुरणार का? याबाबत शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. तालुक्यातील काही गावांमध्ये सिमेंट बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. जलसंधारणाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा खरोखरच उपयोग झाला काय? हे आता लवकरच स्पष्ट होऊ शकणार आहे. गेल्या वर्षी जलयुक्त शिवार अभियानाचा मोठ्या प्रमाणावर गाजावाजा करण्यात आला होता.प्रशासनाकडून तालुक्यात हे अभियान यशस्वी ठरत असल्याचेही सांगितले जात होते. परंतु हे अभियान खरोखरच यशस्वी ठरले की नाही त्याची चाचणी पुढील काही आठवड्यांतच होणार आहे. यावर्षी थंडीप्रमाणेच उन्हाळ्याचाही विक्रम नोंदवला जाणार अशी शक्यता आहे. (प्रतिनिधी)उन्हाळा संपताच ये रे माझ्या मागल्या!प्रशासनाकडून प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये पाणी बचतीचे आव्हान केले जात असते. अनेक स्वयंसेवी संस्थाही या पाणी बचत अभियानात सहभागी होतात. मात्र, उन्हाळा संपताच हे अभियानही संपते आणि पावसाळ्यात उपलब्ध होणारे पाणी जतन करण्यात ना प्रशासनाला रस असतो ना सामान्य नागरिकांना. त्यामुळे प्रत्येक वर्षी उन्हाळ्यातील पाणी टंचाईची अवस्था ‘ये रे माझ्या मागल्या,’ अशीच बनत असते.