शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये वाढली गुडघेदुखी??????????????????

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:53 IST

सांगली : कोरोना रूग्णांची संख्या वेगाने खालावत असताना, अन्य आजारांची संख्या मात्र वाढत आहे. विशेषत: गुडघेदुखी, सांधेदुखीच्या रुग्णांचे प्रमाण ...

सांगली : कोरोना रूग्णांची संख्या वेगाने खालावत असताना, अन्य आजारांची संख्या मात्र वाढत आहे. विशेषत: गुडघेदुखी, सांधेदुखीच्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याचे डॉक्टरांना आढळले आहे.

गेल्या ऑक्टोबरपासून सांगली-मिरजेतील अस्थिउपचार रुग्णालयांत अशा रुग्णांची वाढलेली संख्या डॉक्टरांच्यादृष्टीने चकित करणारी आहे. लॉकडाऊनच्या काळात सलग सात-आठ महिने नागरिकांनी घरात बसून काढले. फिरायला जाणे, व्यायाम करणे हा रोजचा परिक्रम बंद झाला. रस्त्यावर पोलीस आणि कोरोनाचा संसर्ग या दोहोंच्या भीतीने अंगणातही येता आले नाही. टीव्ही व संगणकासमोर बसून दिवस काढल्याने गुडघेदुखी बळावली.

अनेकांना पूर्वीपासूनच गुडघेदुखी सतावत होती, पण लॉकडाऊन काळात शस्त्रक्रिया लांबणीवर टाकाव्या लागल्या. त्यामुळेही गुडघेदुखी आणखी बळावली. वेदनाशामक गोळ्या व मलम वापरून रुग्णांनी कशीबशी कळ काढली. हे रुग्ण लॉकडाऊननंतर रुग्णालयात गर्दी करु लागले आहेत. शासकीय रुग्णालयात गर्दी होत आहे.

गुडघेदुखीची अशी घ्यावी काळजी...

अनियमित जीवनशैलीमुळे गुडघेदुखी बळावते, असे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. जास्त वेळ एकाच ठिकाणी मांडी घालून बसणे, सातत्याने जिने चढ-उतार करणे, आवाक्याबाहेरील ओझे उचलणे ही गुडघेदुखीची काही प्रमुख कारणे आहेत. वाढलेले वजन हेदेखील प्रमुख कारण आहे. वजन नियंत्रणात आणल्यास गुडघ्यांवर ताण पडत नाही. वयोमानानुसार हाडांची झीज झाल्यानेही गुडघे दुखतात. योग्य औषधोपचार आणि तज्ज्ञांकडून शस्त्रक्रिया हेच त्यावरील उपाय आहेत, अशी माहिती अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. गिरीश शिंदे यांनी दिली.

लॉकडाऊनच्या काळात मेडिकलमधून औषधे घेऊन लोकांनी वेदनांवर नियंत्रण मिळविले. सांधेदुखी, संसर्ग किंवा मार लागल्यानेही लोकांना गुडघेदुखीला तोंड द्यावे लागते. हे रुग्ण आता रुग्णालयात येताहेत. आठ महिने लॉकडाऊनमध्ये बसून काढल्याने पायांची हालचाल मंदावली. योग्य काळजी घेतल्यास चिंतेची वेळ येणार नाही.

- डॉ. गिरीश शिंदे, अस्थिरोगतज्ज्ञ

अंगावर काढण्याने आजार बळावले

कोरोनाने लॉकडाऊन आणले आणि लॉकडाऊनने बैठे रोग दिले, अशी काहीशी स्थिती आहे. लॉकडाऊनच्या काळात कोरोना संसर्गाच्या भीतीने लोकांनी रुग्णालयात जाणे टाळले. अनेक आजार अंगावरच काढले. मेडिकलमधून गोळ्या घेऊन दिवस काढले. हे आजार नंतर बळावले. लॉकडाऊन संपताच रुग्णालयांत अशा रुग्णांची गर्दी होऊ लागली. सांगलीतील शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण संख्या दररोज हजारापर्यंत पोहोचली. त्यातील अनेकांचे आजार प्राथमिक उपचारांच्या पुढे गेले होते.

--------------