शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

‘ताकारी-टेंभू’ योजनेच्या पाणीपट्टी दरात वाढ

By admin | Updated: December 12, 2015 00:18 IST

शेतकरी नाराज : वाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर

कडेगाव/देवराष्ट्रे : कायम दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या ताकारी व टेंभू उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टी आकारणी दरामध्ये वाढ होत असल्याचा प्रस्ताव संबंधित योजनेकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे. वीज दरवाढीचा शॉक आता पाणीपट्टी दरवाढीच्या माध्यमातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना बसणार आहे. ताकारी योजनेची पाणीपट्टी बागायती पिकांसाठी ७२२ रुपयांनी वाढली आहे. यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. वाढलेली पाणीपट्टी तात्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. ताकारी आणि टेंभू या दोन्ही उपसा सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रात हजारो हेक्टर उसाचे क्षेत्र वाढले आहे. शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून साखर कारखाने पाणीपट्टी कपात करून घेतात व योजनेकडे भरतात. यामुळे दोन्ही योजना कार्यरत आहेत. २०१४-१५ च्या हंगामात ताकारी योजनेसाठी एकरी ६२११ रुपये पाणीपट्टी आकारणी ऊस पिकासाठी केली होती. परंतु आता वीज दरवाढ तसेच देखभाल-दुरुस्ती खर्च वाढल्याने २०१५-१६ साठी ताकारी योजनेची ७१७३ प्रति एकर याप्रमाणे पाणीपट्टी आकारणीचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला आहे. ताकारी योजनेच्या पाणीपट्टीत ९६२ रुपये प्रति एकर वाढ होत आहे. (वार्ताहर)दरवाढीबाबत फेरविचार व्हावा----याबाबत पाणी वापर संस्था सिंचनचे अध्यक्ष सुबराव महाडिक म्हणाले की, आघाडी शासनाच्या काळात डॉ. पतंगराव कदम मदत व पुनर्वसनमंत्री असताना राज्याच्या टंचाई उपाययोजना निधीतून दुष्काळी परिस्थितीत योजनांची आवर्तने दिली. त्यापेक्षा भीषण दुष्काळ पडला असताना, सध्याचे शासन टंचाई निधीतून आवर्तनाचा निर्णय घेत नाही. शासनाने याबाबतीत तातडीने निर्णय घेऊन टंचाई निधीतून योजनांचे आवर्तन द्यावे. वाजवीपेक्षा जास्त दराने पाणी घेणे शेतकऱ्यांना परवडणार नाही. यामुळे पाणीपट्टी दरवाढीबाबत फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. योजना वर्ष एकरी पाणीपट्टी ताकारी २०१४-१५ ६२११ ताकारी २०१५-१६ ७१७३ वाढ ९६२ रुपयेटेंभू २०१४-१५ ६९६०टेंभू २०१५-१६ ७६८२ वाढ ७२२ रुपये