शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील तेल पिकांच्या उत्पादनात २२९० हेक्टरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:22 IST

सांगली : जिल्ह्यात एकूण गळीत धान्य पिकाच्या पेरणीचे सरासरी ७८ हजार ६३ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी यावर्षी ७७ हजार ...

सांगली : जिल्ह्यात एकूण गळीत धान्य पिकाच्या पेरणीचे सरासरी ७८ हजार ६३ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी यावर्षी ७७ हजार ८०२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. २०१९ च्या तुलनेत यावर्षी दोन हजार २९० हेक्टरने पेरणीचे क्षेत्र वाढले आहे. पण, सोयाबीन, करडई, सूर्यफूल पेरणीचे क्षेत्र घटले आहे. भुईमुगाच्या क्षेत्रात मात्र वाढ झाली आहे.

टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचे पाणी दुष्काळी भागामध्ये फिरले आहे. यामुळे येथील गळीत धान्य पिकाची जागा ऊस, भाजीपाला आणि फळबागांनी घेतल्याचे आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यातील चित्र आहे. सोयाबीनची २०१९ मध्ये ४२ हजार ७०८ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झाल्यामुळे २०२० मध्ये सोयाबीनच्या पेरणीत ९०८ हेक्टरने घट झाली आहे. करडई, सूर्यफूल, तिळाच्या पेरणीत मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. करडईची दहा वर्षात नीचांकी २०० हेक्टर क्षेत्रातच पेरणी झाली आहे. भुईमुगाचे क्षेत्र मात्र दुष्काळी भागासह सधन वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज पश्चिम भागामध्येही वाढले आहे. एकूण गळीत धान्याची पेरणी मात्र दोन हजार २९० हेक्टरने वाढली आहे. तेलाच्या मागणीत वाढ होत असताना सूर्यफूल, करडईचे क्षेत्र घटले आहे.

चौकट

करडई हद्दपार

जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व, तासगाव, खानापूर, कडेगाव तालुक्यामध्ये २००५ पर्यंत करडई पिकाची चार हजार हेक्टरपर्यंत पेरणी होत होती. कोरडवाहू जमिनीमध्ये करडईची पेरणी होत होती. कोरडवाहू जमिनीची जागा बागायत पिकाने घेतल्यामुळे करडई पेरण्याकडील शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे. करडईची पेरणी सध्या केवळ भाजीपुरतीच होत आहे. सध्या केवळ दोनशे हेक्टरपर्यंतच पेरणी होत आहे. जत, आटपाडी तालुक्यातच ती होत आहे. औषधासाठीही करडई सापडत नाही, असे शेतकरी म्हणत आहेत.

कोट

वीस वर्षांपूर्वी शेतकरी करडई, सूर्यफुल, भुईमूग याचे एकत्रित घाण्यावर तेल काढून आणत होते. या तेलावरच आमची दिवाळी पूर्ण होऊन पुढे दोन महिने घरात त्याचा वापर होत होता. अत्यंत चविष्ट असेच ते तेल असायचे. सध्या ही परंपरा पूर्णत: नाहीशी झाली आहे. तेल बियाणांपासून तेल काढण्याचा व्यवसाय जवळपास बंद झाल्यामुळे पेरणीही कमी झाली आहे.

- सुरेश जगताप, शेतकरी.

कोट

सोयाबीनमध्ये २० टक्केच तेल असून ४२ टक्के प्रोटिन जास्त आहेत. तरीही सांगली जिल्ह्यात सोयाबीनचे पेरणी क्षेत्र वाढले आहे. करडई, सूर्यफुलाची दुष्काळी भागामध्ये पेरणी होत होती. पण, गेल्या चार वर्षापासून शेतकरी करडई, सूर्यफुलाऐवजी भुईमूग, सोयाबीन पेरणीकडे वळला आहे.

- धनाजी पाटील,

जिल्हा कृषी अधिकारी, जि. प. सांगली.