इस्लामपूर : शहरातील बेघर वसाहतीमध्ये राहणाऱ्या युवकाला उसने दिलेल्या पैशाचे व्याज मागत त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला चढविणाऱ्या सावकाराच्या पोलीस कोठडीत येथील न्यायालयाने आणखी दोन दिवसांची वाढ केली. रोहित ऊर्फ बारक्या पंडित पवार (रा. इस्लामपूर) असे पोलीस कोठडी मिळालेल्या सावकाराचे नाव आहे. त्याचा साथीदार पंकज मुळीक फरार आहे. हा प्रकार शनिवारी (दि. ७) घडला होता.
याबाबत आदित्य आप्पासाहेब कांबळे (वय १९, रा. बेघर वसाहत) याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. रोहित पवार आणि पंकज मुळीक या दोघांनी त्यांच्याकडे व्याजाच्या पैशाची मागणी करीत त्यांच्या खिशातील १५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर शिवीगाळ करीत त्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने हल्ला केला. पोलीस निरीक्षक समाधान लवटे अधिक तपास करीत आहेत.