शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हवाई हल्ला होताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
3
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
4
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
5
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
6
"माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
7
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
8
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
9
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
10
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
11
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
12
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
13
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
14
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
15
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
16
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
17
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
18
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
19
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
20
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 

जनसुराज्यचा जिल्ह्यात प्रभाव वाढवा

By admin | Updated: August 20, 2016 23:16 IST

विनय कोरे : सांगलीतील बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना

सांगली : जनसुराज्य शक्ती पक्षाचा जिल्ह्यात प्रभाव वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी वाढवा, लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवा. प्रशासन व लोकांमधील दुवा बनून लोकांचा विश्वास वाढवा, अशी सूचना पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री विनय कोरे यांनी केली.येथे आयोजित जनसुराज्य जिल्हा कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांनी स्वागत केले. यावेळी कोरे म्हणाले की, सरकार अपयशी ठरत असताना, लोकांनी विश्वास कुणावर ठेवायचा, असा प्रश्न पडला आहे. जनसुराज्यकडे तरुणांची फळी आहे. कामातून पक्षाची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे. लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर आवाज उठवला पाहिजे. लोकांच्या आज शासनाकडून असलेल्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. त्यामुळे नागरिक पुन्हा पर्यायाचा शोध घेत आहेत. जनसुराज्यकडे असणाऱ्या तरुणांचा यासाठी उपयोग करुन सर्वांनी करुन घेतला पाहिजे. जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवण्याची आज नितांत गरज बनली आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, प्रभाकर सनमडीकर, संघटक शरद देशमुख, आनंद पाटील, युवा शक्ती जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष अतीश अग्रवाल, अ‍ॅड. प्रशांत पाटोळे, सुनील बंडगर, अमोल सातपुते, बाजार समिती संचालक देवराय बिरादार, सुधाकर माळी, एम. के. पुजारी यांच्यासह पदाधिकराी कार्यकर्ते आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आंदोलने उभी करानागरिकांच्या विविध प्रश्नांवर आंदोलनातून आवाज उठवा. शहर, गावातील प्रश्न समजून घेऊन त्याची सोडवणूक करा. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जनसुराज्यचा प्रभाव वाढवण्यासाठी त्याचे नियोजनात्मक संघटन वाढवा, असे आवाहन माजीमंत्री विनय कोरे यांनी बैठकीत केले. यासाठी आतापासून कामाला लागावे. जनतेचे प्रबोधन हे आपले कामच आहे, असेही ते म्हणाले.