शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातक्षम द्राक्षांच्या अबकारीत वाढ : प्रतिकिलो ७० रुपये कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 23:26 IST

सांगली : जिल्ह्यात उत्पादन होऊन बाहेरच्या देशात निर्यात होणाºया द्राक्षांसाठी प्रति किलोला तब्बल ५३ रुपये अबकारी करवाढ

ठळक मुद्देविखे-पाटील यांच्यासह सतरा आमदारांची लक्षवेधी

सांगली : जिल्ह्यात उत्पादन होऊन बाहेरच्या देशात निर्यात होणाºया द्राक्षांसाठी प्रति किलोला तब्बल ५३ रुपये अबकारी करवाढ करण्यात आली आहे. अबकारी करातील वाढीमुळे ७० रुपयांपर्यंतचा कर द्यावा लागणार आहे. वाढलेल्या करामुळे व्यापाºयांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याने उत्पादक अडचणीत आहेत.

यामुळे शेतकºयांना सोसाव्या लागणाºया अबकारी कराच्या बोजासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह सतरा आमदारांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली आहे. लक्षवेधीनंतर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडूनही याबाबतची माहिती मागविण्यात आली आहे. नैसर्गिक अवकृपा व दरातील चढउतारामुळे अगोदरच द्राक्ष उत्पादक अडचणीत सापडला आहे.

या पार्श्वभूमीवर अबकारी करातील वाढीमुळे अडचणी वाढल्या आहेत. याबाबत विरोधी पक्षनेते विखे-पाटील, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, नसीम खान, अमीन पटेल, त्र्यंबक भिसे, वर्षा गायकवाड, अमर काळे, सुनिल केदार, अस्लम शेख, हर्षवर्धन सपकाळ, डॉ. संतोष टारफे, अब्दुल सत्तार, संग्राम थोपटे, राहुले बोंद्रे, भारत भालके, अ‍ॅड यशोमती ठाकूर यांनी लक्षवेधी मांडली आहे. द्राक्ष बागायतदारांची परिस्थिती लक्षात घेवून त्याबाबतची कार्यवाही शासनाने करावी यासाठीची ही लक्षवेधी असून, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडूनही त्याबाबत माहिती मागविण्यात आली आहे. आमदारांच्या लक्षवेधीमुळे सरकार बागायतदारांबाबत कोणता निर्णय घेणार याबाबतची उत्सुकता द्राक्ष बागायतदारांमध्ये आहे.व्यापारी नसल्याने दर कोसळलेयंदा समाधानकारक द्राक्ष उत्पादन व चांगला माल असतानाही व्यापारी नसल्याने दर पडले आहेत. त्यात अबकारी करातील करवाढीमुळे शेतकरी चिंतेत आहे. गतवर्षीच्या तुलनेत ५३ रुपयांची करवाढ शेतकºयांच्या माथ्यावर केंद्र सरकारने नवीन संकट आले आहे. आता सरकार काय निर्णय घेणार याकडे उत्पादकांचे लक्ष लागले आहे.