शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
"पैसे देणे होत नसेल, तर पत्नी माझ्या घरी आणून सोड"; व्याजाच्या पैशावरून त्रासाने संपवलं जीवन
3
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
6
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
7
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
8
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
9
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
10
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
11
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
12
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
13
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
14
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
15
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
16
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
17
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
18
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
19
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
20
कर्नाटकातील अथणीत कार-बसचा अपघात, चौघे ठार; कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

टोलच्या व्याजाचा भार वाढता!

By admin | Updated: August 19, 2015 22:24 IST

याचिकेला विलंब : दिरंगाईमुळेच बसला टोलचा झटका

सांगली : आजवर अशोका बिल्डकॉन कंपनीच्या वाढीव खर्चाबाबत निर्णय घेण्यास केलेल्या विलंबामुळेच सांगलीला दुहेरी टोलचा झटका बसला आहे. हा अनुभव गाठीशी असतानाच, पुन्हा याचिकेला विलंब लावल्यामुळे व्याजाचे गणित वाढतच आहे. त्यामुळे शासकीय पातळीवरील दिरंगाईबद्दल आता नाराजी व्यक्त होत आहे. सांगलीतील आयर्विन पुलाला पर्यायी बायपास पूल बांधण्याचे काम अशोका बिल्डकॉन कंपनीला २३ मार्च १९९९ ला देण्यात आले. १९९५-१९९६ च्या दरसूचीप्रमाणे या प्रकल्पाची किंमत शासनाने ४ कोटी ५३ लाख रुपये निश्चित केली होती. निविदा मागविण्यात आल्यानंतर एकच निविदा विकली गेली व प्राप्त झाली. ६५ टक्के वाढीव दराने म्हणजे ७ कोटी ५0 लाख रुपयांची ही निविदा होती. शासनाने ही निविदा वाढीव दराने ७ आॅक्टोबर १९९८ रोजी मंजूर केली. त्यानंतर कंपनीने २५ सप्टेंबर २000 रोजी काम पूर्ण केले. त्यानंतर लगेच महिन्याभराने पथकर वसुलीला सुरुवात झाली. त्याचवेळी कंपनीने वाढीव १ कोटी २0 लाखांसाठी शासनाकडे मागणी केली. शासनाकडून या रकमेबाबत प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या वादावर तोडगा काढण्यासाठी लवाद क्र. १ नियुक्त करण्यात आला. यामध्ये रा. श्री. अत्रे हे मुख्य लवादक होते. शासन लवादक म्हणून जी. के. देशपांडे व उद्योजक लवादक म्हणून मा. गो. धारप यांनी काम पाहिले. मुख्य लवादक व उद्योजक लवादक यांनी कंपनीचा दावा मान्य केला होता. त्यानंतर सांगली जिल्हा न्यायालयात शासनाने केलेले अपील न्यायालयाने फेटाळले. त्यानंतर पुन्हा शासनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच वादासंदर्भात पुन्हा लवाद क्र. २ ची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर हे मुख्य लवादक होते. शासन लवादक म्हणून जी. के. देशपांडे, तर उद्योजक लवादक म्हणून मा. गो. धारप यांनी काम पाहिले. बहुमताने लवादाने उद्योजकांचा दावा अमान्य केला. यासंदर्भात उद्योजकांनी पुन्हा जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. दुसऱ्या लवादाचा निर्णय शासनाच्या बाजूने असूनही शासकीय अधिकाऱ्यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. याशिवाय पुढील न्यायालयीन बाबींमध्येही शासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. शासकीय स्तरावरील या विलंबाचा फटका पुन्हा शासनालाच बसत आहे. निर्णय घेण्यास जेवढा विलंब होणार आहे, तेवढे व्याजाचे गणित वाढणार आहे. (प्रतिनिधी)प्रश्न व्याजाचा...अशोका बिल्डकॉन कंपनी आणि शासनामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून व्याजदराबाबतही वाद सुरू आहे. कंपनीने निविदेसोबत सादर केलेल्या रोकड प्रवाह गणिती तक्त्यामध्ये २३ टक्के व्याजदर दर्शविला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी दिलेल्या प्रशासकीय टिप्पणीमध्ये म्हटले आहे की, निविदेमधील कलम ३.७.११ नुसार रोकड प्रवाह गणिती तक्त्यातील व्याजदर रिझर्व्ह बँकेच्या प्राईम लँडिंग दरानुरूप बदलण्याचा व त्यानुसार प्रकल्प सवलत कालावधित सुधारणा करण्याचा अधिकार कार्यकारी अभियंत्यांना आहे. याच नियमाच्या आधारे कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागात अनेकदा पत्रव्यवहारही झाला आहे.