नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. यावरून तालुक्यातील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची ऑनलाईन बैठक शनिवारी पार पडली. यावेळी ते होते.
पवार म्हणाले की, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी कायदेशीर, अभ्यासपूर्ण लढाईची गरज आहे. हे संभाजी ब्रिगेड गेली तीस वर्षे सांगत आहे.
आरक्षण मिळवायचे झाल्यास आदी मराठा समाजाचा ओबीसी घटकांत समावेश होणे गरजेचे आहे. त्यानंतर आपण आरक्षणास पात्र होऊ. अन्यथा आरक्षण मिळणे कठीण आहे.
त्यामुळे या संचारबंदीनंतर संभाजी ब्रिगेड राज्यात पुरुषोत्तम खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाचा एल्गार करणार आहे. त्याची सुरवातही तासगाव-कवठेमहांकाळमधून होणार आहे. त्यामुळे आरक्षणाच्या लढाईसाठी ब्रिगेडच्या सोबत मराठा बांधवांनी यावे.
बैठकीस सकल मराठा समाजाचे कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष नानासाहेब पाटील, घाटमाथ्याचे नेते सूर्यकांत पाटील, विक्रांत पाटील, प्रतीक चव्हाण, सचिन कोडग, राहुल पोळ, प्रताप शिंदे, विशाल शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.