लोकमत न्यूज नेटवर्क
खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथे आमदार अनिल बाबर यांच्या प्रयत्नाने खरसुंडी ते बलवडी रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणा कामासाठी चार कोटी निधी मंजूर केला. या कामाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.
श्री सिद्धनाथांचा पालखी मार्ग, सासणकाठी सोहळा विनाअडथळा पार पाडण्यासाठी भुयारी विद्युत वाहिनीचे कामही पूर्ण झाले असून, त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत १४वा वित्त आयोगातून शाळा व अंगणवाडीसाठी विविध साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास जि. प. माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, आटपाडी माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजीराव पाटील, युवक काँग्रेसचे जयदीप भोसले, पं. स. सदस्य सारिका भिसे, सरपंच लता पुजारी, उपसरपंच सलिमा शिकलगार, खरसुंडी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी, सुवर्णा पुजारी, सविता पुजारी, मंगल डोंगरे, शिवसेना खरसुंडीचे अध्यक्ष मोहन शिंदे, दिलीप जानकर, रोहित भांगे उपस्थित होते. विनोद पुजारी यांनी आभार मानले.
200921\screenshot_2021-09-20-15-28-46-13.jpg
खरसुंडीत विविध विकास कामाच्या उदघाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर शिवसेना नेते तानाजीराव पाटील ,जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत देठे सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ