मिरजेतील रेल्वेस्थानक ते बसस्थानकापर्यंत अडीच कोटी खर्चाचा ट्रिमिक्स रस्ता करण्यात येणार आहे. चार महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन झाल्यानंतर रस्त्याचे काम रखडले आहे. रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटीकरणाच्या कामात ठेकेदाराने स्टीलचा वापर केला नसल्याने हा रस्ता जास्त दिवस टिकणार नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. रस्त्याच्या कामासाठी गेले महिनाभर रेल्वेस्थानक रस्ता पत्रे लावून बंद करण्यात आला आहे. आता संचारबंदी काळात रस्त्याचे काम घाईगडबडीत आटोपण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न आहे. या कामाकडे महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. या रस्त्यांच्या कामाची चाैकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत ठेकेदारास सूचना देण्याचे आश्वासन देत महापाैर व स्थायी समिती सभापती व नगरसेवक तेथून निघून गेले.
मिरज रेल्वेस्थानक ते बसस्थानक अडीच कोटींच्या ट्रिमिक्स रस्तेकामाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:27 IST