हाक्के म्हणाले, विनाकारण घराबाहेर पडू नका, मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून प्रशासनास सहकार्य करा. काही दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. काळजी घ्या. कोणतीही लक्षणे दिसली, तर त्वरित रुग्णालयात जा. आपल्यापासून इतरांना धोका पोहोचणार नाही, याची दक्षता घ्या.
ढालगाव परिसरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, ग्रामीण भागात कोविड सेंटरची गरज होती. सभापती हाक्के यांनी ही बाब पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील व आमदार सुमनताई पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे तत्काळ २५ बेडचे अत्याधुनिक कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
यावेळी तात्यासाहेब नलवडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दत्तात्रय पाटील, ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.सतीश कोळेकर, डॉ. रूपनर, हणमंत मोहिते, गोविंद खरात आदी उपस्थित होते.