शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

फटाके गोदामांवर छापे; पाच लाखांचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : विनापरवाना आणि लोकवस्तीत फटाक्यांचा साठा करून त्याची विक्री करणाºया अड्ड्यांवर तसेच गोदामांवर छापे टाकण्याचे आदेश देऊनही अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात येताच, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील मंगळवारी स्वत: रस्त्यावर उतरले. सांगलीत हरिपूर रस्त्यावर छापा टाकून त्यांनी सुमारे चार लाखांचा फटाक्यांचा साठा जप्त केल्यानंतर महसूलची यंत्रणा फटाफट कामाला ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : विनापरवाना आणि लोकवस्तीत फटाक्यांचा साठा करून त्याची विक्री करणाºया अड्ड्यांवर तसेच गोदामांवर छापे टाकण्याचे आदेश देऊनही अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात येताच, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील मंगळवारी स्वत: रस्त्यावर उतरले. सांगलीत हरिपूर रस्त्यावर छापा टाकून त्यांनी सुमारे चार लाखांचा फटाक्यांचा साठा जप्त केल्यानंतर महसूलची यंत्रणा फटाफट कामाला लागली. सांगलीच्या कारवाईनंतर मिरज, कवठेमहांकाळ, वाळवा व शिराळा तालुक्यात रात्री उशिरापर्यंत छापासत्र सुरू होते.बुधगाव व कवलापूर (ता. मिरज) येथेही फटाके स्टॉलवर छापा टाकून एक लाखाचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. ते म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालय व गृह विभागाने लोकवस्तीत फटाके स्टॉल व तसेच गोदामात साठा करू नये, असे आदेश दिले आहेत. तरीही या आदेशाचे जिल्ह्यात पालन होताना दिसत नाही. पंधरा दिवसांपूर्वी महापालिका, पोलिस व महसूल विभागाची संयुक्त बैठक घेऊन या आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना केली होती. जिथे स्टॉल लावण्यास जागा निश्चित करुन दिली आहे, तिथेच स्टॉल लागले पाहिजेत, असेही सांगितले होते. शहरात लोकवस्तीत कुठेही स्टॉल लावू नयेत, असेही सांगितले होते.काळम-पाटील म्हणाले की, महापालिकेने सोमवारी पाच पथके तयार करून तपासणी सुरू केली. मिरजेत सहा ते सात विक्रेत्यांनी लावलेले स्टॉल बंद करून ते जागा निश्चित करुन दिलेल्या ठिकाणी हलविले; पण सांगलीत असे कोठेच घडले नाही. फटाके स्टॉल व गोदामाबाबत मंगळवारी सकाळी पुन्हा बैठक घेतली. पोलिस अधिकारी, महापालिका व महसूलचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आढावा घेतला; पण अधिकाºयांनी सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे सांगितले. तरीही त्यांनी दुपारी १२ ते २ या वेळेत आढावा घ्यावा.अनधिकृत स्टॉल किंवा गोदामात फटाके ठेवले असतील तर ते हलविण्यात यावेत; अन्यथा मी स्वत: छापा टाकणार, असा ‘अल्टिमेटम’ दिला होता. हरिपूर रस्त्यावर काळीवाट येथे महादेव पाटणे याने त्याच्या स्वत:च्या जागेत मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा केल्याची माहिती मिळाली. त्याचे नाव व पत्ता लिहून एका पथकास कारवाई करण्यास सांगितले.जिल्हाभर छापेजिल्हाधिकारी स्वत: छापे टाकत असल्याचे समजताच पोलिस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने शिराळा, कवठेमहांकाळ, वाळवा, मिरज, तासगाव तालुक्यात छापे टाकले. रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरु होती. त्यामुळे कारवाईचा सविस्तर तपशील मिळू शकला नाही. सांगलीत जप्त केलेला फटाक्यांचा साठा बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे ठेवण्यात आला आहे. बुधगाव, कवलापूर येथील प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी छापे टाकून एक लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे.परवाने रद्द करणारदिवाळीसाठी फटाके विक्री तसेच गोदामात फटाक्यांचा साठा करण्यास ज्यांना परवाने दिले आहेत, त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई दिवाळी झाल्यानंतर केली जाईल. यापुढे शहरात कुठेही लोकवस्तीत फटाके स्टॉल व गोदामे दिसून आली, तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.सणाचा आधार घेऊ नका!काळम-पाटील म्हणाले की, दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे. हा सण फटाके फोडून साजरा करण्यास आमचा विरोध नाही. फटाके विक्रीलाही विरोध नाही. पण सणाचा आधार घेऊन लोकवस्तीत फटाके स्टॉल व फटाक्यांचे गोदाम करणे अत्यंत चुकीचे आहे. नियम पाळावेत, एवढेच माझे म्हणणे आहे. लोकांच्या जीविताशी कोणीही खेळू नये. प्रशासनाला कोणी कायदा शिकविण्याचा प्रयत्न करु नये. पंधरा दिवसांपूर्वी कारवाईबाबतचा आदेश देऊनही यंत्रणा हलली नाही. शेवटी मला रस्त्यावर उतरावे लागले. मी छापा टाकल्याचे समजताच यंत्रणा कामाला लागली.