शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील अपघातसंख्येत तब्बल १३ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 19:39 IST

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : वाहनांची वाढती संख्या, खराब रस्ते, वेगावर नसलेले नियंत्रण आणि बेशिस्तपणा अशा ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : वाहनांची वाढती संख्या, खराब रस्ते, वेगावर नसलेले नियंत्रण आणि बेशिस्तपणा अशा अनेक गोष्टींमुळे जिल्ह्यातील अपघातांची संख्या वाढत आहे. २0१७ च्या तुलनेत २0१८ मध्ये सांगली जिल्ह्यात १३ टक्के अपघात वाढले आहेत. राज्यातील अपघातांच्या वाढीचे प्रमाण 0.८० असताना जिल्ह्याचे हे प्रमाण चिंताजनक आहे.सांगली जिल्ह्यात एकीकडे वाहनसंख्येत वाढ होत असताना अरुंद व खराब रस्ते, रस्त्यावरील वाहनधारकांचा बेशिस्तपणा, अतिक्रमणे, वेगावर नसलेले नियंत्रण अशा कारणांनी अपघात मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रशासकीय स्तरावर अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरीही त्यात यश मिळताना दिसत नाही.आकडेवारी अधिकच...महाराष्टÑ मोटार वाहन विभागाने प्रसिद्ध केलेली ही आकडेवारी जानेवारी ते जून २0१८ पर्यंतची आहे. २0१७ मधील अपघात संख्येशी तिची तुलना केली आहे. अपघात संख्येतील आकडेवारीचा विचार करता कोल्हापूर राज्यात क्रमांक एकवर असून, सांगली राज्यात आठव्या क्रमांकावर आहे. अपघातात मृत्यू होण्याच्या बाबतीत कोल्हापूर क्रमांक एकवर, तर सांगली २२ व्या क्रमांकावर आहे, तर जखमींच्या संख्येतही कोल्हापूर क्रमांक एकवर असून, सांगली ११ व्या क्रमांकावर आहे.राज्यात २0१७ च्या तुलनेत २0१८ मध्ये एकूण अपघातसंख्येत 0.८० टक्के वाढ झाली आहे. सांगली जिल्ह्यात ही वाढ १३ टक्क्यांच्या घरात आहे. राज्यात अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत ९.२७ टक्के वाढ झाली असताना जिल्ह्यात ही वाढ ८.६३ टक्के म्हणजे कमी दिसते. दुसरीकडे जखमींच्या आकडेवारीत राज्यात १.६७ टक्के वाढ असताना जिल्ह्यात ही वाढ १0.४0 टक्के दिसते. त्यामुळे अपघातसंख्या कमी होण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे बनले आहेवाहनसंख्येत होतेय झपाट्याने वाढदिवसागणिक वाहनसंख्या वाढत आहे. ३0 एप्रिल २0१९ च्या आकडेवारीनुसार एकूण वाहनसंख्या ९ लाख १५ हजार ६८७ इतकी आहे. ३१ मार्च २०१८ मध्ये ही संख्या ८ लाख ५० हजार ७४८ इतकी होती. म्हणजेच जवळपास एक वर्षात वाहनसंख्येत ६४ हजार ९३९ ची भर पडली. म्हणजेच जिल्ह्यात महिन्याकाठी जवळपास साडेपाच हजार वाहने रस्त्यावर येत आहेत. .