शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत आज दोनशे सार्वजनिक मंडळांच्या गणेशाचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:26 IST

मिरज : मिरजेत आज, रविवारी सुमारे दोनशे सार्वजनिक मंडळांच्या गणेशाचे विसर्जन होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुका व वाद्यांशिवाय ...

मिरज : मिरजेत आज, रविवारी सुमारे दोनशे सार्वजनिक मंडळांच्या गणेशाचे विसर्जन होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुका व वाद्यांशिवाय होणाऱ्या विसर्जनसासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महापालिकेने गणेश तलाव व कृष्णाघाटावर नदीपात्रात विसर्जनासाठी तराफे व बोटींची व्यवस्था केली आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांनी खासगी जागेत गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. शहरात सुमारे ३५० सार्वजनिक मंडळांपैकी रविवारी अखेरच्या दिवशी दोनशे मंडळांच्या गणेशाचे तलावात व कृष्णाघाटावर विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणुकीत वाद्ये व गर्दीला प्रतिबंध करण्यात आला आहे. सायंकाळपर्यंत विसर्जन करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने मंडळांना दिल्या आहेत. विसर्जनासाठी मिरवणूक मार्गावर होणारी गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मिरजेतील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य असलेल्या मिरवणूक मार्गावरील स्वागत कमानी सलग तिसऱ्या वर्षी रद्द करण्यात आल्या आहेत. गणेश विसर्जनासाठी शहरात समतानगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान व गाडवे चौकासह काही ठिकाणी जलकुंभ व एका फिरत्या जलकुंभाची व्यवस्था व गणेशमूर्ती दान करण्याची सोय महापालिकेने केली आहे. गणेश विसर्जन सोहळा साधेपणाने होणार असला तरीही मिरजेत मोठा पोलीस बंदोबस्त आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह दोन उपअधीक्षक, दहा निरीक्षक, तीस उपनिरीक्षक, तीनशे पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे पथक विसर्जन बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव व विसर्जन सोहळ्यावर निर्बंध असल्याने बाप्पांना निरोप देताना दरवर्षीचा उत्साह यावेळी नाही. दोन वर्षांपूर्वी महापूर व त्यानंतर सलग दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्याने ना मिरवणूक, ना ढोल-ताशा, ना स्वागत कमानी अशा साध्या वातावरणात उत्सव पार पडत आहे.