शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कामेरीत खोल पाणंद रस्त्यालगतची अतिक्रमणे त्वरित हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:21 IST

: कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील खोल पाणंदीपासून पुढे शेळके-डंके-कदम-सावंत मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी केलेली अतिक्रमणे तात्काळ दूर ...

:

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील खोल पाणंदीपासून पुढे शेळके-डंके-कदम-सावंत मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी केलेली अतिक्रमणे तात्काळ दूर करून पूर्वीप्रमाणे ३३ फुटी रस्ता खुला करून मिळावा, अशी मागणी कामेरी येथील शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख बंडाकाका पाटील यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शेतकऱ्यांना आपला ऊस बाहेर काढण्यासाठी हा महतत्त्वाचा पाणंद रस्ता असल्याने काही वर्षापूर्वी साखर कारखान्यांनी अतिक्रमणे दूर करून ३३ फुटी रस्ता मुरुमीकरण करून दिला होता. मात्र सध्या बाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमणे केल्याने रस्ता अरुंद झाला आहे. रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी खोल चरी काढल्यामुळे ऊस वाहतुकीसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. या भागातील १५० एकरापेक्षा जास्त उसाला कारखान्याच्या तोडी येऊनही ऊसतोडणी कामगार व वाहन मालक हे ऊस तोडणीसाठी नकार देत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वेळेत ऊस तोडणी सुरू होण्याच्यादृष्टीने तहसीलदार यांनी रस्त्याची चार दिवसात प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना अतिक्रमणे दूर करण्यास सांगावे, अशी मागणी या निवेदनात केली आहे.

नायब तहसीलदार धनश्री भांबुरे यांनी तहसीलदार यांच्यावतीने हे निवेदन स्वीकारले. तात्काळ या रस्त्याची पाहणी करून अतिक्रमणे दूर करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन या शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले.

यावेळी भगवान कदम, तुकाराम पाटील, दिनेश जाधव, योगेश पाटील, पोपट कदम, महेश शेळके, माणिक शेळके, बबलू निंबाळकर, सर्जेराव शेळके, विश्वास निंबाळकर उपस्थित होते.

फोटो ओळी :

कामेरी (ता. वाळवा) येथील खोल पाणंद रस्त्यालगत अतिक्रमणे दूर करण्यासाठी नायब तहसीलदार धनश्री भांबुरे यांना निवेदन दिले. यावेळी भगवान कदम, पोपट कदम, तुकाराम पाटील, दिनेश जाधव, योगेश पाटील आदी उपस्थित होते.