शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाच्या निधीचा बेकायदेशीर वापर

By admin | Updated: November 21, 2015 00:23 IST

दिवाबत्तीची बिले काढली : महापालिका स्थायी समितीत विषय गाजणार

सांगली : महापालिकेच्या घरकुल योजनेकडील शासकीय निधीतून दिवाबत्तीच्या ठेकेदाराला सुमारे एक कोटी रुपयांची बिले अदा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आता या प्रकरणात सारवासारव करण्यासाठी रक्कम तबदिलचा विषय स्थायी समितीसमोर आणण्यात आला. वास्तविक घरकुलाचे काम पाहणाऱ्या नगरअभियंत्यांनी बेकायदेशीर निधीची गैरवापर केल्याचे स्पष्टपणे म्हटले असतानाही विद्युत अभियंत्यावर कारवाई करण्याऐवजी त्यावर पांघरूण घालण्याचाच प्रयत्न महापालिकेत सुरू आहे. महापालिकेच्या स्थायी समितीची शनिवारी सभा होत आहे. या सभेत दिवाबत्ती ठेकेदाराला दिलेल्या एक कोटी रुपयांच्या बिलाची रक्कम इतर लेखाशीर्षात तबदिल करण्याचा विषय अजेंड्यावर घेतला आहे. ही रक्कम विद्युत विभागाच्या शिफारशीवरून शासकीय निधीतून देण्यात आली आहे. घरकुल योजनेची रक्कम इतर विभागाच्या बिलासाठी कशी खर्च केली जाऊ शकते, हा खरा प्रश्न आहे. याबाबत घरकुलचे नगरअभियंत्यांनी वरिष्ठांकडे टिपणी सादर केली आहे. त्यात एक कोटीच्या निधीचा गैरवापर झाल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. हा एक कोटीचा निधी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेकडे वर्ग करावा, अशी मागणीही केली आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून विद्युत अभियंत्याच्या घोटाळ्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत विद्युत अभियंत्याकडूनही खुलासा घेण्यात आला आहे. त्यात त्यांनी देखभाल दुरुस्तीच्या लेखाशीर्षाकडे रक्कम कमी असल्याने व ठेकेदाराचे बिल देणे क्रमप्राप्त असल्याने शासकीय खात्यातून बिल अदा केल्याचे मान्य केले आहे. शिवाय भविष्यात अशाप्रकारे इतर खात्यामधून विद्युत विभागाची बिले अदा करणार नाही, असे नमूद केले आहे. यावरून विद्युत अभियंत्यांनीही आपली चूक कबूल केल्याचेच चौकशीमध्ये स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)निधी कमी पडणारमहापालिकेच्या अंदाजपत्रकात ११०५ पथदिवे विद्युत आकार या लेखाशीर्षावरील आॅक्टोबरअखेर ६ कोटीच्या तरतुदीपैकी दिवाबत्ती बिलापोटी ३ कोटी ७० लाख रुपये खर्च झाले आहेत. अजून २ कोटी ३० लाख शिल्लक आहेत. महापालिकेला दरमहा सरासरी ५२ लाख रुपयांचे वीजबिल येते. नोव्हेंबर ते मार्च या पाच महिन्यासाठी वीजबिलापोटी अडीच कोटीची गरज आहे. त्यात शिल्लक रकमेतील एक कोटी रुपये इतर विभागाकडे वर्ग केल्यास या खात्यात एक कोटी ३० लाख रुपये शिल्लक राहतील. त्यातून दोन ते तीन महिन्याचे वीजबिल देता येईल. त्यामुळे भविष्यात रस्त्यावरील दिवे बंद होऊन अंधार पसरण्याची शक्यता आहे.