शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

पात्रेवाडीत झाडांची बेकायदा कत्तल

By admin | Updated: May 7, 2016 00:58 IST

मुख्याध्यापकाकडून प्रकार : आटपाडी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार

आटपाडी : पात्रेवाडी (ता. आटपाडी) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या आवारातील जुन्या लिंब आणि सुबाभूळ झाडांची तोड करून त्यांची मुख्याध्यापकाने परस्पर विक्री केल्याचा प्रकार घडला आहे. मोठी १० झाडे तोडल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.झाडे तोडा आणि पैसे कमवा!आटपाडी पंचायत समितीच्या अनेक विभागातील भोंगळ कारभाराच्या तक्रारींमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. कर्मचारी बेलगाम झाले आहेत. मुख्याध्यापकानेच शाळेच्या आवारातील झाडे तोडून विकली, तरीही ग्रामस्थांच्या लेखी तक्रारीची अधिकारी वाट पाहत बसले. या गंभीर प्रकाराबाबत आता काय कारवाई केली जाणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.पात्रेवाडी येथे इयत्ता १ ली ते ४ थी अशी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेच्या आवारात सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी लावलेली लिंबाची आणि सुबाभळीची झाडे होती. ही झाडे गुरुवारी मुख्याध्यापक कचरे यांनी बेकायदेशीरित्या तोडली. या झाडांची त्यांनी विक्रीही केल्याचा ग्रामस्थ आरोप करीत आहेत. ही झाडे तोडण्यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभाग, गटविकास अधिकरी अथवा वनीकरण विभाग यापैकी कुणाचीही परवानगी घेतली नाही. याबाबत पात्रेवाडीचे माजी सरपंच भीमराव रामचंद्र जाधव यांनी गटविकास अधिकारी सौ. मीना साळुंखे यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत पात्रेवाडीचे माजी सरपंच भीमराव जाधव म्हणाले की, हा भाग सतत दुष्काळी आहे. या भागात जास्तीत जास्त झाडे लावण्याची गरज असताना, मुख्याध्यापक कचरे यांनी बेकायदेशीररीत्या झाडे तोडून विकली आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई केली नाही, तर ग्रामस्थांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडू. (वार्ताहर)