शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेतील अ‍ॅपेक्स केअर रुग्णालयास नियमबाह्य परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST

मिरजेतील अ‍ॅपेक्स केअर कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या २०५ रुग्णांपैकी तब्बल ८७ रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर डॉ. महेश जाधव यास ...

मिरजेतील अ‍ॅपेक्स केअर कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या २०५ रुग्णांपैकी तब्बल ८७ रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर डॉ. महेश जाधव यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिसानी अटक केली आहे. महापालिका प्रशासनाने गतवर्षी व यावर्षी साध्या अर्जावर डॉ. महेश जाधव यास तीन महिन्यांसाठी कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. आयसीएमआरच्या निर्देशाप्रमाणे कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी फिजिशियन, इंटेसिव्हिस्ट व इतर तज्ज्ञ डाॅक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, डॉ. महेश जाधव याच्या कोविड रुग्णालयात उपचारासाठी फिजिशियन व अन्य सुविधा नसतानाही महापालिका प्रशासनाने त्यास कोविड रुग्णालय सुरू करण्यास परवानगी कशी दिली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डाॅ. जाधव याने कागदोपत्री नियुक्त केलेल्या डाॅक्टरांनी येथील रुग्णांवर झालेल्या उपचाराबाबत हात झटकले आहेत. पोलिसांनी अ‍ॅपेक्स केअर कोविड रुग्णालयास नियमांनुसार परवानगी देण्यात आली होती का? याची विचारणा महापालिका प्रशासनास केली आहे. कोविड रुग्णालयास परवानगी देताना नियमांचे उल्लंघन झाल्यास जिल्ह्यातील टास्क फोर्सला त्याची तपासणी करण्याचे अधिकार आहेत. मात्र, अ‍ॅपेक्स कोविड रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूबाबत व बिलाच्या आकारणीबाबत वारंवार तक्रारी झाल्या. रुग्णांच्या नातेवाइकांकडून रुग्णालयातील साहित्याची मोडतोडीचे प्रकार घडल्यानंतरही टास्क फोर्सने याची चाैकशी केलेली नाही. डाॅ. जाधव याने आर्थिक फायद्यासाठी कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी एमडी मेडिसीन डाॅक्टरांसह अन्य काही डाॅक्टरांची कागदोपत्री नियुक्ती दाखवून परवानगी घेतल्याचे स्पष्ट होत असल्याने याची पोलिसांनी चाैकशी सुरू केली आहे.