शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत जिल्हा निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धांचे बेकायदेशीर आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:24 IST

सांगली : कोविड काळात क्रीडा स्पर्धा व निवड चाचणी स्पर्धांना शासनाने परवानगी दिलेली नाही. तरीही सांगलीतील काही संघटना त्यांचे ...

सांगली : कोविड काळात क्रीडा स्पर्धा व निवड चाचणी स्पर्धांना शासनाने परवानगी दिलेली नाही. तरीही सांगलीतील काही संघटना त्यांचे विनापरवाना आयोजन करत आहेत. त्यांना प्रतिबंध करण्याची मागणी सांगली जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

संघटनेचे सचिव संजय परमणे व अध्यक्ष ए. एल. पाटील यांनी सांगितले की, १४ ते २० वर्षे वयोगटातील मुले व मुलींसाठी कनिष्ठ गट मैदानी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न काही संघटना करत आहेत. त्यांना शासनाची परवानगी नाही, तरीही नियमबाह्यरित्या आयोजन केले जात आहे. कोरोनामुळे सध्या फक्त सरावाला परवानगी आहे, स्पर्धांना नाही. त्यामुळे या निवड चाचणीमध्ये खेळाडूंनी सहभागी होऊ नये.

ते म्हणाले की, मैदानी खेळांच्या राज्य संघटनेविषयी गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. ॲथलेटिक्स संघटनेतर्फे राज्य निवडीसाठी अधिकृत कनिष्ठ गट राष्ट्रीय मैदानी स्पर्धा लवकरच घेतली जाणार आहे, त्यासाठीची बैठक लवकरच होईल. त्यानंतर अधिकृत आयोजनाविषयी खेळाडूंना कळविले जाईल. या स्थितीत खेळाडू व पालकांनी आयोजकांच्या अधिकृततेविषयी खातरजमा करूनच सहभागी व्हावे.

चौकट

अर्थकारणासाठी स्पर्धांचे आयोजन

परमणे, पाटील म्हणाले की, संघटनेच्या मान्यतेविषयी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे; पण कुरघोडी करण्यासाठी व अर्थकारणासाठी काहीजण स्पर्धा आयोजित करत आहेत. खेळाडूंनी भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी सहभागी होऊ नये.

---------