शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

प्रतीक पाटील, शैलजाभाभींचा मेळाव्यावर बहिष्कार

By admin | Updated: June 23, 2016 01:42 IST

पलूसमधील प्रकार : कॉंग्रेस नेत्यांची नावे, छायाचित्रे फलकावर नसल्याने उमटला नाराजीचा सूर

पलूस : तालुक्यात बुधवारी झालेल्या कॉँग्रेसच्या मेळाव्यावर माजी केंद्रीयमंत्री प्रतीक पाटील आणि राज्य महिला कॉंग्रेसच्या सरचिटणीस शैलजाभाभी पाटील यांनी बहिष्कार टाकला. व्यासपीठावर लावलेल्या फलकावर राष्ट्रीय व राज्यस्तरावरील कोणत्याही पक्षीय वरिष्ठ नेत्याचे नाव नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा सुरू झाली आहे. आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्यासाठी सर्व तालुकास्तरावर जनसंपर्क मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. पलूसमधील नववा मेळावा बुधवारी सांगडेवाडी येथे झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मोहनराव कदम होते. यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील, पक्षनिरीक्षक माजी आमदार प्रकाश यलगुलवार, प्रकाश सातपुते, सत्यजित देशमुख, हाफिज धत्तुरे, महेंद्र लाड, मीनाक्षी सावंत उपस्थित होते.प्रतीक पाटील, शैलजाभाभी मेळाव्यासाठी आले होते. व्यासपीठावर लावलेल्या बोर्डावर कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी अथवा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे कोणाचेच छायाचित्र किंवा नाव नसल्याचे लक्षात आल्यानंतर मेळावा पक्षाचा नसून कदम काँग्रेसचा आहे, असे दिसून येताच प्रतीक पाटील, शैलजाभाभी पाटील नाराज झाले. मेळाव्यास न थांबता ते आपल्या कामासाठी निघून गेले. मेळाव्यास जे. के. बापू जाधव यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते अनुपस्थित होते. याचीही चर्चा सभास्थळी सुरू होती.मेळाव्यात पतंगराव कदम म्हणाले की, काँग्रेसची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व तालुकास्तरावर मेळावे आयोजित करणारा सांगली जिल्हा एकमेव आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व नगरपंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषदेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसच्या चिन्हावरच लढवायच्या आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी गट, तट न पाहता जिद्दीने व आत्मविश्वासाने पक्षाचे काम करुन गड कायम राखावा. तालुकाध्यक्ष ए. डी. पाटील यांनी स्वागत, तर सतीश पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पृथ्वीराज चव्हाण, गिरीश गोंदिल, के. डी. कांबळे, सभापती विजय कांबळे, श्वेता बिरनाळे, मालन मोहिते, वैभव पुदाले, महादेव पाटील, आनंदराव मोहिते, पृथ्वीराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. (वार्ताहर)चूक तालुका कॉँग्रेसची!सभा संपल्यानंतर प्रतीक पाटील, शैलजाभाभी यांच्या बहिष्काराबाबत आ. पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हा प्रश्न तालुका काँग्रेसचा आहे. त्यांनी बोर्डावर त्यांचे छायाचित्र लावायला हवे होते. निदान नाव तरी छापायला पाहिजे होते. ही चूक तालुका काँग्रेसची आहे.