शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजना पूर्ण न केल्यास टाळे ठोकू

By admin | Updated: November 6, 2014 22:56 IST

आर. आर. पाटील : जीवन प्राधिकरण विभागाला इशारा

तासगाव : तासगाव शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी पाणी पुरवठा टप्पा क्र. ३ ही योजना ३0 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण झाली नाही, तर जीवन प्राधिकरणच्या कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आर. आर. पाटील यांनी आज (गुरुवारी) तासगावात दिला.येथील पंचायत समितीच्या सभापती दालनात रखडलेल्या पाणी योजनेबाबतची माहिती आ. पाटील यांनी जीवन प्राधिकरणचे अधिकारी, नगरपरिषदेचे प्रशासन यांच्याकडून घेतली. २0११ मध्ये ही योजना पूर्ण व्हायला हवी होती. पालिकेत नगरसेवकांनी जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना कोंडून घालण्याचा प्रकारही केला होता.सरकारच्या यु.आय.डी.एस. एस. एम. टी. या योजनेंतर्गत या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी आहे. सुमारे २१ कोटी खर्चाची ही योजना अद्याप का पूर्ण झाले नाही, याबाबतची विचारणा आ. पाटील यांनी केली. निधीची अडचण, शासनस्तरावर पाईप्स खरेदीचा विषय वेळेत झाला नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावर आर. आर. आबांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. २१ कोटींच्या योजनेला आतापर्यंत १७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यातील १५ कोटी रुपये खर्च झाले आहेत, २ कोटी रुपये शिल्लक आहेत. अद्याप पाईप्सच्या आॅर्डर दिलेल्या नाहीत. तेव्हा या योजनेबाबत गांभीर्याने लक्ष घालून काम करावे. या योजनेतील पुणदी रस्त्यावरील टाकीत पाणी पडून त्याचे वितरण दि. ३0 नोव्हेंबरला झाले पाहिजे. सिध्देश्वर कॉलनी, बापूवाडी, महिला तंत्रनिकेतन या भागात पाण्याची तक्रार असल्याचेही आ. पाटील यांनी सांगितले. योजना पूर्ण झाली नाही, तर कार्यालयांना कुलपे घालू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच पाणी योजनांच्या बाबतीत राजकारण करून जनतेला वेठीस धरल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा आमदार आर. आर. पाटील यांनी दिला.यावेळी नगराध्यक्ष संजय पवार, नगरपालिकेचे नगरसेवक, आदी पदाधिकाऱ्यांबरोबरच, कार्यकारी अभियंता नागरगोजे, उपअभियंता ए. डी. चौगुले, मुख्याधिकारी अभिजित वायकोस उपस्थित होते. (वार्ताहर)आता मी इथेच आहे पाणी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आर. आर. पाटील यांनी दूरध्वनीवरून चर्चाही केली. त्यांनी अधिकाऱ्यांना शहराच्या पाणी पुरवठा योजनेचे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीत आबा म्हणाले की, आता मी इथेच आहे. तेव्हा काम करावेच लागेल. अन्यथा वाईट दिवस येतील, असा सज्जड इशारा त्यांनी यावेळी बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला.