शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज भराल तर गाढवावरून धिंड काढू

By admin | Updated: October 10, 2016 00:29 IST

शिराळकरांचा इशारा : नागपंचमीच्या प्रश्नावरून गावात झळकले निवडणुकांवरील बहिष्काराचे फलक

शिराळा : शिराळा येथील नागपंचमीबाबत शिराळकरांची एकी घट्ट होऊ लागली आहे. नागपंचमीदिवशी आगामी सर्व निवडणुकांच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला होता. निवडणुकांवरील बहिष्काराबरोबरच आता जी व्यक्ती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करेल, त्याची ‘गाढवावरून धिंड’ काढण्याचा इशारा शिराळकरांनी दिला आहे. रविवारी चौकाचौकांत तसे फलक लावल्याने आगामी निवडणुकांना नेतेमंडळी कोणत्याप्रकारे सामोरे जाणार, याची जोरदार चर्चा शहरात आहे. येथील जगप्रसिद्ध पारंपरिक नागपंचमीवर न्यायालयीन प्रक्रियेतून निर्बंध आले आहेत. गेली ११ वर्षे न्यायालयाचा मान राखत संयमाने नागपंचमी साजरी करण्यात येत आहे. परंपरागत चालत आलेल्या जिवंत नागपूजेवरही गतवर्षीपासून बंदी घालण्यात आल्याने शिराळकरांमध्ये तीव्र नाराजी आहे. याविरोधात शिराळकरांनी राजकीय, सामाजिक, न्यायालयीन पातळीवर आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. अखेर यंदाच्या नागपंचमीवेळी ग्रामस्थांनी आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. याचबरोबर नागपंचमीवेळी शहरात सर्वत्र काळे झेंडे फडकावत निवडणुकांवर बहिष्कार घालत असल्याचे फलक झळकवले. शिवाय नागपंचमी मिरवणुकीत सहभागी सर्व नाग मंडळांनीही निवडणुकांवर बहिष्काराचे फलक झळकावले होते. त्यावेळी सर्व राजकीय मंडळींनीही शहरवासीयांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले होते. आता नगराध्यक्ष आरक्षण, जिल्हा परिषद निवडणुकांची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर हा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. रविवारी शहरात नवीन फलक झळकू लागले आहेत. यामध्ये गाढवाचे चित्र दर्शविण्यात आले असून, ‘जो निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरेल, तो माझी सवारी करेल’, असा मजकूर लिहिला आहे. येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नगरपंचायतीची पहिली निवडणूक होत आहे. यामुळे पहिला बहिष्कार या निवडणुकीवर होत आहे. एकीकडे नागपंचमीप्रश्नी तोडगा निघाल्याशिवाय माघार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला असताना दुसरीकडे ‘गाढवाची सवारी’ चर्चेत आल्याने इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यास धजावणार नाहीत. नागपंचमीस जिवंत नागपूजेस परवानगी मिळावी, अशी मागणी यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आली असून यासाठी शिराळकर एकवटत असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर) नागपंचमीपासून बहिष्काराचे फलक शिराळा शहरात नागपंचमीपासून बहिष्काराचे फलक, तसेच काळे झेंडे, पताका लावण्यात आल्या आहेत. रविवारी पुन्हा ‘गाढवाची सवारी’चे फलक चौकाचौकांत झळकू लागल्याने नगरपंचायत निवडणुकीच्या वातावरणात नवीन चर्चा सुरू झाली आहे.