शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात वेतन न दिल्यास आंदोलन

By admin | Updated: June 29, 2015 00:27 IST

शिक्षकांची मागणी : लोंढे प्रकरणातून दोषमुक्त क रा

भिलवडी : माध्यमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी डी. सी. लोंढे यांनी मान्यता दिलेल्या जिल्ह्यातील १९० शिक्षक व शिक्षकेतरांवर अनियमिततेचा ठपका ठेवून, मे महिन्यापासून वेतन रोखले आहे. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची वास्तववादी चौकशी करण्याऐवजी प्रशासनाने केवळ शिक्षकांच्या चौकशीचा फार्स बनवून त्यांना बळीचा बकरा बनविले आहे. येत्या चार-पाच दिवसांत शिक्षकांचे नियमित वेतन न दिल्यास सर्व अन्यायग्रस्त शिक्षक आणि संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत. लोंढे प्रकरणातील जिल्ह्यातील १९० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुनावणी प्रक्रिया नुतकीच पार पडली. सुनावणी प्रक्रियेमध्ये त्या शिक्षक व शिक्षकेतरांसह शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींनी आपली बाजू भक्कमपणे मांडली. कायद्यानुसार शासकीय कर्मचारी दोषी नसेल, तर त्याचे वेतन शासनास रोखता येत नाही. तरीही बेकायदेशीररित्या शिक्षकांचे वेतन रोखले गेले आहे. लोंढे यांच्या अगोदर माध्यमिक शिक्षण विभागात वैयक्तिक मान्यता प्रस्ताव फायलींचा ढीग लागला होता. सहा महिन्यांच्या कालावधित लोंढे यांनी कायदेशीर पळवाट शोधून चारशेंवर शिक्षकांना मान्यता दिली होती. हे सर्वच शिक्षक नोकरीत कायम झाले. पण केवळ १९० शिक्षकांचीच चौकशी लावून बाकीच्यांना ग्रीन सिग्नल का देण्यात आला, याची मागणी जोर धरत आहे. रोस्टर डावलून मान्यता देताना संबंधित शिक्षण संस्थांनी भविष्यात रिक्त होणाऱ्या जागांवर अनुषेशानुसार भरती करणार असल्याचे हमीपत्र सादर केल्यानंतरच शिक्षकांना वैयक्तिक मान्यता दिली आहे. काही संस्थांनी अनुशेषानुसार जागा भरल्याही आहेत, तर काही संस्थांनी आरटीई अ‍ॅक्टचा फटका बसल्याने नवीन भरती करता येईना. लोंढेंनी पळवाट काढून मान्यता दिली. संस्थाचालकांनीही याबाबत लेखी हमी दिली होती, मात्र या प्रकरणात कारण नसताना शिक्षक वर्ग भरडला जात आहे.लोंढेंच्या पूर्वीही अनेक शिक्षणाधिकाऱ्यांनी अशाचप्रकारे शिक्षकांना नेमणुका दिल्या होत्या. मग त्या सर्व नेमणुकांकडे दुर्लक्ष करून आमच्यावरच अन्याय का? असा प्रश्न कारवाईच्या छायेत असलेले शिक्षक उपस्थित करीत आहेत. याबाबत हे सर्व शिक्षक माहिती अधिकाराचा वापर करून, यापूर्वी दिलेल्या नेमणुकीची चौकशी करणार आहेत. शासनाने या प्रकरणाबाबत वास्तववादी चौकशी करून शिक्षकांचे वेतन द्यावे, अन्यथा न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याबरोबरच तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे. (वार्ताहर)शिक्षक माहिती अधिकाराचा वापर करणारलोंढेंच्या पूर्वीही काही शिक्षणाधिकाऱ्यांनी अशाचप्रकारे नेमणुका दिल्या होत्या. मग आमच्यावरच अन्याय का? याबाबत हे सर्व शिक्षक माहिती अधिकाराचा वापर करून, यापूर्वी दिलेल्या नेमणुकीची चौकशी करणार आहेत. शासनाने या प्रकरणाबाबत वास्तववादी चौकशी करून शिक्षकांचे वेतन द्यावे, अन्यथा न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याबरोबरच तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.