शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डास मरत नसतील तर औषध काय कामाचे?

By admin | Updated: May 26, 2017 23:10 IST

डास मरत नसतील तर औषध काय कामाचे?

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मोकाट कुत्री, डुकरे, जागोजागी पडलेला कचरा, डासांचे वाढते साम्राज्य या विषयांवरून गुरुवारी महापालिकेच्या नगरसेवकांनी आरोग्य विभागाचा पंचनामा केला. डासांच्या औषध खरेदीत बनवेगिरी असून, डास मरत नसतील तर हे औषध काय कामाचे? असा सवाल खुद्द महापौर हारूण शिकलगार यांनीच बैठकीत उपस्थित केला. तसेच मोकाट कुत्री पकडण्यासंदर्भात आठवड्याला अहवाल देण्याचे आदेश त्यांनी दिले.गत महासभेत नगरसेवकांनी कचरा उठाव, मोकाट कुत्री या विषयावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर महापौर शिकलगार यांनी स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुरुवारी महापालिकेच्या सभागृहात आरोग्यकडील वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, मुकादम यांची बैठक झाली. या बैठकीला स्थायी समिती सभापती संगीता हारगे, उपायुक्त सुनील पवार उपस्थित होते. बैठकीनंतर महापौर शिकलगार म्हणाले की, पालिकेच्या चार प्रभागांना डॉक्टरांची स्वच्छता अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पण त्यांची जबाबदारी काय, हेच नगरसेवकांना माहीत नाही. स्वच्छतेबाबत नागरिक नगरसेवकांकडे तक्रारी करतात. त्यामुळे संबंधित निरीक्षक आणि मुकादमांनी दररोज नगरसेवकांना भेटावे. नगरसेवकांकडून सूचना घेऊन कामे करावीत. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली जाईल. महापालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांचा उच्छाद झाला आहे. त्यासाठी पहाटे साडेचार ते सात आणि रात्री नऊ ते अकरा या वेळेत कुत्री पकडण्याची मोहीम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचा अहवाल उपायुक्त व आपणाला देण्याची सूचना केली आहे. तीन महिने कचरा उठाव नसल्याची तक्रारबैठकीत माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी, त्यांच्या प्रभागात तीन महिन्यापासून कचरा उठाव झाला नसल्याचे सांगितले. राजू गवळी यांच्यासह अनेक नगरसेवकांनी, डास फवारणी औषधांचा दर्जा आणि त्यांच्या खरेदीतही बोगसगिरी असल्याचे आरोप केले. याप्रकरणी औषधे खरेदीचा लेखाजोखा सादर करण्याचेही आदेश देण्यात आले. शहरात चिकनचे गाडे आणि कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यांचा अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले.