शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महापौर समस्या घेऊन येतच नाहीत, तर निधी कसा देणार?--सुभाष देशमुख यांची काँग्रेसवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 20:11 IST

सांगली : आम्ही पक्ष, राजकारण बाजूला ठेवून राज्याचा आणि प्रत्येक जिल्'ाचा विकास होण्याच्यादृष्टीने प्रयत्न करीत आहोत.

ठळक मुद्दे निधी अडविणे ही भाजपची संस्कृती नाहीआमचे आमदार काम करतात अडचणी त्यांनी सांगितल्याच नाहीत, तर त्यांचे प्रश्न मला कसे कळतील?, खीळ घालण्याचा प्रयत्न;

सांगली : आम्ही पक्ष, राजकारण बाजूला ठेवून राज्याचा आणि प्रत्येक जिल्'ाचा विकास होण्याच्यादृष्टीने प्रयत्न करीत आहोत. मी पालकमंत्री झाल्यापासून एकदाही सांगलीचे महापौर विकास कामे घेऊन माझ्याकडे आले नाहीत. तर त्यांना निधी कुठून मिळणार, असा सवाल पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी उपस्थित केला. उलट भाजपचे आमदार शहरात कामे करीत असताना, त्यांनाही खीळ घालण्याचे काम महापालिकेतील सत्ताधारी करीत आहेत, अशी टीका त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर केली. निधी अडविणे ही भाजपची संस्कृती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सांगलीत शुक्रवारी आढावा बैठक झाल्यानंतर पालकमंत्री देशमुख पत्रकारांशी बोलत होते. सांगली, मिरज व कुपवाड महापालिका क्षेत्रातील विकास कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रश्न विचारला असता, देशमुख म्हणाले की, सांगली, मिरज शहराच्या विकासाकडे कधीच आम्ही दुर्लक्ष केले नाही. विकास कामात राजकारण आणण्याची भाजपची रणनीतीच नाही. मी सांगलीचा पालकमंत्री झाल्यापासून एकदाही महापालिकेचे महापौर, पदाधिकारी विकास कामे घेऊन माझ्याकडे आले नाहीत. मी तर शहराचा विकास करण्यासाठी अनेक योजनांचे नियोजन करत आहे. शहरातील समस्या घेऊन महापौर माझ्याकडे आले, तर निश्चितच ती विकास कामे मार्गी लावण्यात येतील. महापौरांनाच शहरातील प्रश्न सोडवायचे नसतील, तर आम्ही त्याला काय करणार?, असा टोलाही देशमुख यांनी महापालिकेतील सत्ताधाºयांना लगावला.

ते म्हणाले की, विकास कामासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे निधीची कोणतीही अडचण नाही. सांगली शहरात आमदार सुधीर गाडगीळ, मिरज शहरात आमदार सुरेश खाडे विकास कामे घेऊन शासनाकडे जातात. त्यासाठी लागणारा निधी खेचून आणतात. पण, याला महापालिकेतील सत्ताधाºयांकडून हवे तेवढे सहकार्य मिळत नसल्याची टीकाही देशमुख यांनी केली.दिवाळीपूर्वी शेतकºयांना कर्जमाफीचे पैसे मिळणारकर्जमाफीपासून एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी आम्ही पुन्हा कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी सात दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर आठ ते दहा दिवसात अर्जांची छाननी आणि सोशल आॅडिट करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यासाठी महसूल, सहकार विभागाच्या अधिकाºयांना रात्रीचा दिवस करून कामे पूर्ण करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आॅक्टोबर महिन्यात कर्जमाफीचे पैसे शेतकºयांच्या खात्यावर वर्ग होतील, असा विश्वासही सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.उद्योग वाढीला उद्योजकांचेही प्रयत्न हवेतसांगलीचा औद्योगिक विकास वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. पण, यासाठी उद्योजकांनीही काही प्रमाणात पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यांच्या समस्या, नवीन प्रकल्प याबाबत सूचना आणि प्रस्ताव देण्याची गरज आहे. मीही उद्योजक आहे. पण, सांगलीचा पालकमंत्री झाल्यापासून एकदाही उद्योजक माझ्याकडे त्यांच्या समस्या घेऊन आले नाहीत. त्यांच्या अडचणी त्यांनी सांगितल्याच नाहीत, तर त्यांचे प्रश्न मला कसे कळतील?, असा टोलाही सुभाष देशमुख यांनी उद्योजकांच्या शिष्टमंडळाला लगावला.