शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

होम आयसोलेशन बंद केले तर साडेदहा हजार रुग्णांना घराबाहेर काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:28 IST

सांगली : सांगली जिल्ह्यात होम आयसोलेशनवर निर्बंधांचा निर्णय शासनाने घेतल्याने अकरा हजार रुग्णांना घराबाहेर काढावे लागणार आहे. त्यांच्यासाठी गावोगावी ...

सांगली : सांगली जिल्ह्यात होम आयसोलेशनवर निर्बंधांचा निर्णय शासनाने घेतल्याने अकरा हजार रुग्णांना घराबाहेर काढावे लागणार आहे. त्यांच्यासाठी गावोगावी संस्थात्मक विलगीकरण केंद्रे सुरू करावी लागणार आहेत.

राज्यातील १५ जिल्ह्यांत कोरोनाची तीव्रता जास्त असल्याने होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय मंगळवारी झाला, त्यात सांगलीचाही समावेश आहे. जिल्ह्यात मंगळवारअखेर १३ हजार २४९ सक्रिय रुग्ण असून, त्यातील १० हजार ४२५ घरगुती विलगीकरणात आहेत. त्यांच्यावर शंभर टक्के नियंत्रण नसल्याने सुपर स्प्रेडर ठरत आहेत. त्यांची रवानगी आता संस्थात्मक विलगीकरणात केली जाईल.

पहिल्या लाटेप्रमाणे दुसऱ्या लाटेत गावोगावी केंद्रे सुरू झाली नाहीत. रुग्ण घरातच राहिले. सर्रास घरात स्वतंत्र खोल्या, स्वच्छतागृह नसल्याने संपूर्ण कुटुंबे बाधित झाली. गावातही फैलाव झाला. कोरोनाचा आलेख वाढला. कोरोना रोखण्यासाठी दक्षता समित्यांनी सक्रिय होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी वेळोवेळी केले आहे. प्रत्यक्षात कार्यवाही होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या घरावर फलक लावणे, मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करणे, हाय रिस्क काँटॅक्ट शोधणे अशी कामे झाली नाहीत. त्यामुळे घरगुती विलगीकरण बंद करून रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

चौकट

खर्च १५ व्या वित्त आयोगातून

काही ग्रामपंचायतींनी विलगीकरण केंद्रासाठी पैसे कोठून आणणार, असा प्रश्न जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे उपस्थित केला होता. शासनाने १५ व्या वित्त आयोगातून खर्चाला मंजुरी दिल्याने पेच सुटला आहे.

चौकट

मंगळवारअखेर सक्रिय रुग्णसंख्या - १३,२४९

घरगुती विलगीकरणातील रुग्ण - १०,४२५

महापालिका क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरण केंद्रातील रुग्ण - १७१

ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरण केंद्रातील रुग्ण - ३०३

कोट

पहिल्या लाटेत गावोगावी कम्युनिटी सेंटर्स सुरू होती. त्याच धर्तीवर यावेळेस संस्थात्मक विलगीकरण केंद्रे सुरू करणे अपेक्षित आहे. शासनाने होम आयसोलेशन बंदचा निर्णय घेतला असला तरी मार्गदर्शक सूचना अद्याप मिळालेल्या नाहीत. होम आयसोलेशन बंद केल्याने कोरोना नियंत्रणात आणण्यात मदत होणार आहे.

- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक

कोट

शाळा इमारती किंवा शासकीय इमारतीत संस्थात्मक विलगीकरण केंद्रे सुरू करता येतील. त्यासाठी फार खर्च येणार नाही. खर्चाविषयक ग्रामपंचायतीची शंका निरर्थक आहे. रुग्णाला कुटुंबातूनच जेवण देता येऊ शकते. त्यामुळे संस्थात्मक विलगीकरण केंद्रांसाठी गावांनी पुढाकार घेतला पाहिजे.

- डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्याधिकारी