शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पतीची आत्महत्या; पत्नीचा गुदमरून मृत्यू

By admin | Updated: June 16, 2017 23:19 IST

पतीची आत्महत्या; पत्नीचा गुदमरून मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कपुसेगाव : येथील शिक्षक कॉलनीत लिपिक पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर पत्नीचा अंथरूणातच गुदमरून मृत्यू झाला. पतीच्या आत्महत्येचे, तर पत्नीच्या संशयास्पद मृत्यूचे कारण पोलिसांना समजले नसून, पत्नीचा व्हिसेरा पोलिसांनी राखून ठेवला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.याबाबत अधिक माहिती अशी की, निढळ (ता. खटाव) येथील हनुमान विद्यालयात सुनील कृष्णराव मखरे (वय ४९) हे लिपिक पदावर कार्यरत होते. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे पती-पत्नी घरातील माडीवर झोपले होते, तर त्यांची मुलगी अक्षदा ही खालच्या खोलीमध्ये झोपली होती. सकाळी बराचवेळ झाला तरी आई-बाबा का उठले नाहीत, हे पाहण्यासाठी अक्षदा माडीवर गेली असता तिला वडिलांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. तर आई अंथरुणावर निपचीत पडली होती. हा प्रकार पाहून अक्षदाने हंबरडा फोडला.तिने फौजदार असलेल्या भाऊ अतुल यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तेही तत्काळ घरी आले. त्यांनी वहिनींना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याही मृत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत काहीनी पुसेगाव पोलिसांनाही या प्रकाराची कल्पना दिली. त्यामुळे पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेले. डॉ. मेघना कुलकर्णी तसेच डॉ. प्रल्हाद इंजे यांनी शवविच्छेदन केले. सुनील यांचा मृत्यू गळफासाने झाला असल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाले. तर अनुराधा यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. मात्र कशामुळे गुदमरला हे अद्याप स्पष्ट झाले नसून तपासानंतर खरी वस्तुस्थिती समोर येणार आहे.सुनील मखरे हे गेल्या २२ वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेत लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी अनुराधा (वय ३९) या घरकाम करत होत्या. त्यांना अक्षदा नावाची एकुलती एक मुलगी आहे. सध्या तिने १२ वी शास्त्र शाखेत ५७ टक्के गुण मिळविले आहेत. तिला सातारा येथील कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्याबाबत घरात चर्चाही झाली होती. तसेच सुनील मखरे यांनी आपल्याला शाळेतील कामाचा भयंकर त्रास होत असल्याबाबत पत्नीला वारंवार सांगितल्याचेही बोलले जात आहे. अत्यंत सुखी व आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंब म्हणून मखरे यांच्या घराकडे पाहिले जात होते. मात्र असे काय घडले की आपल्या एकुलत्या एक मुलीची काहीही काळजी न करता दोघांनीही आपली जीवनयात्रा संपवली, याबाबत सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. सहायक पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.आठ-दहा दिवसांपासून अनुराधा यांचे मौन !गेल्या आठ-दहा दिवसांपासून अनुराधा या काहीशा नाराज असल्याचे कॉलनीतील लोकांना जाणवत होते. शेजारील महिलांशी त्यांचे बोलणे खूपच कमी झाल्याची चर्चा आसपासच्या महिलांमध्ये होती. गेल्या दोन दिवसांपूर्वी पती-पत्नीने घराभोवतीचा परिसर, फळ व फूल झाडांची बाग स्वच्छ केली होती. कधी-कधी पत्नी-पत्नीमध्ये किरकोळ वाद होत होते; परंतु घराबाहेर याची वाच्यता कधीही झाली नसल्याची चर्चाही आहे.