शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेकडो हात सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील पूरग्रस्तांच्या मदतीला शुक्रवारी शेकडो हात सरसावले. सामाजिक संघटनांसह राजकीय नेतेमंडळी पूरग्रस्तांच्या स्थलांतरणासाठी धावले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील पूरग्रस्तांच्या मदतीला शुक्रवारी शेकडो हात सरसावले. सामाजिक संघटनांसह राजकीय नेतेमंडळी पूरग्रस्तांच्या स्थलांतरणासाठी धावले होते. महापालिका प्रशासनानेही नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.

दोन वर्षांपूर्वी शहराला महापुराचा मोठा फटका बसला होता. तेव्हाही अनेक संघटना लोकांच्या मदतीला आल्या होत्या. यंदाही हेच चित्र शहरात दिसत आहे. सध्या कृष्णा नदी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचली आहे. शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. महापालिकेने गुरुवारी सायंकाळपासून नागरिकांना स्थलांतरणाच्या सूचना केल्या होत्या. आता महापालिकेसोबतच सामाजिक संघटना व राजकीय नेतेमंडळीही धावून आली आहेत.

नागरिक जागृती मंचच्यावतीने सेवाभावी संस्था, गणेशोत्सव मंडळ, दानशूर व्यक्ती यांची जिल्हा संपर्क व आपत्ती व्यवस्थापन कृती समिती स्थापन केली आहे. जिल्हा सुधार समितीने पाण्यामुळे अडकलेले लोक, आपत्कालीन मदत, जनावरे, वैद्यकीय मदत, अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी मदतीसाठी तरुणांची फळी कार्यरत केली आहे. आयुष सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते सक्रिय झाले असून, पुलावरील नागरिकांची गर्दी, वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे. सांगलीवाडीत माजी आमदार दिनकर पाटील, नगरसेवक अजिंक्य पाटील यांच्या राॅयल कृष्णा बोट क्लब व युवक मराठा क्रीडा संस्थेनेही रेस्क्यू फोर्स तयार ठेवली आहे. राॅयल युथ फाउंडेशन व मावळा प्रतिष्ठानने आपत्ती मदत पथक स्थापन केले आहे. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे कार्यकर्तेही मदतीला धावले आहेत.

चौकट

टीम विशालकडून निवाऱ्याची व्यवस्था

वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील ‍यांच्या नेतृत्वाखाली टीम विशाल व नगरसेवक मनोज सरगर यांच्या सांगली फ्रेंडस् सर्कल पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली आहे. या टीमकडून स्थलांतरासाठी तीन ट्रॅक्टरची व्यवस्था केली होती. संजय नगर येथील यश मंगल कार्यालय, शाळा नंबर ४४ व वसंतदादा कामगार भवन या तीन ठिकाणी निवारा व जेवणांची सोय करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले आहे. स्थलांतरीत नागरिकांत कोरोनाबाधित आढळल्यास त्याच्या उपचाराची व्यवस्था केली आहे.

चौकट

राजकीय नेतेमंडळी मैदानात

गतवेळी महापुराचा फटका राजकीय नेतेमंडळींना बसला होता. त्यामुळे यंदा साऱ्याच पक्षांचे नेते पूरग्रस्तांच्या मदतीला मैदानात उतरले आहेत. आमदार सुधीर गाडगीळ युवा मंच, पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्यावतीने पूरग्रस्तांना स्थलांतरणात मदत केली जात होती, तर काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी सांगली शहरासह पद्माळे येथील पूरबाधित भागाला भेट देत नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर होण्याचे आवाहन केले.