सांगली : शहरातील संजयनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा पाठलाग करून एकतर्फी प्रेमातून विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी पीडित महिलेने विजय भगवान सोनवणे याच्याविरोधात संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला ही संजयनगर परिसरातच राहण्यास आहे. मंगळवारी सकाळी पीडित महिला तिच्या मुलीला येथील शाळेत सोडण्यासाठी गेली होती. संशयित सोनवणे पण तिथे गेला व त्याने महिलेला मला तुमच्याशी बोलायचे आहे, असे म्हणत मोबाइल नंबर घेतला. त्यानंतर सोनवणे याने वारंवार त्या महिलेला फोन करून मला तुमच्याशी मैत्री करायची आहे, मला तुम्ही आवडता असे म्हणत त्रास देऊ लागला.
यापूर्वीही संशयिताने त्रास दिल्याने पीडित महिलेने संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.