फोटो ओळ : गुरुपौर्णिमा व आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर चिखलगी भुयार तुकाराम बाबा महाराज यांनी भाविकांना लसीकरणाबाबत जनजागृती केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : कोरोनापाठोपाठ महापुराने थैमान घातले आहे. सांगलीतील पूरग्रस्तांसाठी श्रीसंत बागडेबाबा मानव मित्र संघटना शक्य ती मदत करणार आहे, अशी माहिती चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकारामबाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गुरुपौर्णिमा व आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर चिखलगी भुयार तुकारामबाबा महाराज यांनी भाविकांना लसीकरणाबाबत जनजागृती केली. तुकारामबाबा महाराज म्हणाले, महापुराच्या संकटात मानवतेच्या धर्मातून मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. कोरोनाच्या काळात जीवनावश्यक किट, घरोघरी भाजीपाला पोच केला. जळीत कुटुंबीयांना मदत केली आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून पूरग्रस्त भागात जिथे मदतीची गरज आहे, त्या ठिकाणी अन्नधान्य, वैरण, पाण्याच्या बाटल्या दिल्या जाणार आहे. मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.