शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीत माणुसकीचे दर्शन

By admin | Updated: September 7, 2016 23:54 IST

नेवरीत कार्यकर्त्याचा मृत्यू : समाजाकडून मदतीचा ओघ$$्

गणेश पवार ल्ल नेवरी सामाजिक कार्यकर्त्यांच्या पश्चात समाज त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडतो, हा कटू इतिहास आहे. परंतु कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील तळमळीच्या कार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर वेगळाच अनुभव आला. त्याच्या रक्षाविसर्जनासाठी स्मशानभूमीत आलेल्या गावकऱ्यांनी ५० हजारांची रोख मदत त्याच्या कुटुंबियांना देऊन त्याच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलला. गावकऱ्यांचा मदतीचा सढळ हात पाहिल्यानंतर, माणुसकी अजूनही जिवंत आहे, याची प्रचिती सर्वांना आली. कमलाकर देवकर (वय ४३) कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील हरहुन्नरी तरुण. वडिलांपासून दुरावल्यामुळे आईसमवेत आजोळी राहायचा. दुसऱ्यांचा आधार होण्यासाठी धावून जायचा. पारंपरिक केशकर्तनाचा व्यवसाय असला तरी, त्याचा जास्त वेळ सामाजिक कार्यातच खर्च व्हायचा. साहजिकच कुटुंबाची आर्थिक फरफट नेहमीचीच. राजकारणाचा असो किंवा कुस्त्यांचा फड, कुणाला आजारपणात मदत असो किंवा रानामाळाती लकाम, जिथं कुणाचं काम अडल, तिथं आपण पोहोचायचं आणि प्रत्येक काम तडीस न्यायचं, हा त्याचा स्वभाव. त्याच्या मृत्यूनंतर रक्षाविसर्जनासाठी गावकरी आणि नातेवाईकांनी हजेरी लावली. कमलाकरच्या कुटुंबाला उघड्यावर पडू द्यायचं नाही, असा निश्चय झाला. शोकसभा सुरू असतानाच मदतीचा ओघ सुरू झाला. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि दत्तकुमार खंडागळे यांनी दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीही या कुटुंबाचे एक वर्षाचे वीज बिल पगारातून भरण्याचे जाहीर केले.पुण्याई फळाला आली कमलाकर देवकर यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्याची आई, पत्नी आणि दोन मुले यांचे काय होणार, याचं नातेवाईकांना कोडं पडलं होतं. पोराबाळांना वनवासी करून गेल्याची खंत काही वृध्द बोलून दाखवत होते. मात्र, कमलाकरने केलेली पुण्याई फळाला आली.