शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’चा गणपती उपक्रमांतर्गत कार्यशाळेस उदंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व कलाविश्वाला वेगळा आयाम देणारा गणेशोत्सव लवकरच सुरु होत आहे. ‘टाटा टी गोल्ड मिक्श्चर’ व ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या उपक्रमाचाच एक भाग म्हणून बुधवारी शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा पार पडली. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व कलाविश्वाला वेगळा आयाम देणारा गणेशोत्सव लवकरच सुरु होत आहे. ‘टाटा टी गोल्ड मिक्श्चर’ व ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या उपक्रमाचाच एक भाग म्हणून बुधवारी शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा पार पडली. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि दीपप्रज्ज्वलनाने झाली. यावेळी व्यासपीठावर टाटा टी गोल्डचे प्रकाश साळुंखे-पाटील आणि प्रशिक्षिका स्नेहा चौंधीकर उपस्थित होत्या. सौ. स्नेहा चौंधीकर आणि त्यांच्या सहकाºयांनी महिलांना सहज आणि सोप्या पद्धतीने गणपती कसे बनवायचे याचे प्रशिक्षण दिले. यावेळी चिमुकल्यांनीही मातीशी खेळून गणपती बनविण्याचा हसतखेळत सराव केला. कार्यशाळेतून एका दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या उत्साहाचेही दर्शन झाले.कार्यशाळेस शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उत्कृष्ट गणेशमूर्ती बनविणाºया सखी आणि बालचमूंना बक्षिसे देण्यात आली. सखी सदस्यांमध्ये प्रथम क्रमांक मनीषा कुमामेकर, द्वितीय पूजा मालू, तृतीय सुजाता शिंदे, चतुर्थ माया शितोळे, पाचवा क्रमांक मेघा पाटील यांना मिळाला. बालचमूमध्ये प्रथम क्रमांक रोहित केरीपाळे, द्वितीय अभिषेक कदम, तृतीय रोजा शेट्टी, चौथा कार्तिक लोहार, पाचवा क्रमांक माधुरी कोळी यांना मिळाला.गणेशोत्सव फक्त पुरुषांनीच साजरा करावा, असा नियम नाही. त्यामुळे आपल्या ‘ती’ला त्यात मानाचे स्थान देऊया. ‘ती’ला गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचा, ‘ती’ला गणरायाची पहिली पूजा करण्याचा मान देऊन, नव्या सामाजिक अभिसरणाच्या मोहिमेला सुरुवात करूया. या विचाराअंतर्गत गणपतीची प्रतिष्ठापना, पाच दिवस आरती, पूजा, महिलांसाठी विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत. गणेशोत्सवामध्ये ‘ती’ला.. स्त्रीला महत्त्वाचे स्थान मिळावे म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमचे आपल्याला सस्नेह निमंत्रण आहे की, आपण सर्वांनी आमच्या ‘ती’चा गणपती मंडळाला भेट द्यावी. (फक्त महिलांनीच नव्हे, तर पुरुषांनीदेखील येऊन दर्शनघ्यावे).‘लोकमत भवन’, वसंतदादा औद्योगिक वसाहत, माधवनगर रोड येथे हा ‘ती’चा गणेशोत्सव साजरा होणार आहे. या उपक्रमात स्त्रीशक्तीचा जागर विविध क्षेत्रांतील महिलांना सन्मानित करून करण्यात येणार आहे. दररोज विविध क्षेत्रांतील महिलांच्याहस्ते गणेशाची आरतीही होणार आहे.ढोल-ताशात गणरायाचे आगमन‘लोकमत’ सखी मंच आणि ‘टाटा टी गोल्ड’तर्फे प्रथम सांगलीमध्ये ‘ती’चा गणपती हे महिला गणेश मंडळ स्थापन करीत आहोत. श्रींच्या आगमनाची भव्यदिव्य अशी मिरवणूक दि. २४ आॅगस्ट रोजी दु.२.०० वाजता घन:श्यामनगरच्या कमानीपासून ‘लोकमत’ भवन, वसंतदादा औद्योगिक वसाहत, माधवनगर रोड येथे होणार आहे. तरी सर्व सखींनी पारंपरिक वेशभूषेमध्ये मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.