शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

संजयकाकांची तासगावात भाजपला किती मदत ?

By admin | Updated: December 29, 2016 23:46 IST

अजितराव घोरपडे : अप्रामाणिक कोण हे कळेलच!

मिरज : भाजपशी प्रामाणिक असल्याचा आव आणणाऱ्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मदत केली असती तर तासगावात मी निवडून आलो असतो. पक्षाशी प्रामाणिक कोण व अप्रामाणिक कोण, हे थोड्या दिवसांत कळेल. त्यासाठी थांबा व पाहा! राष्ट्रवादीसोबत जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढविणाऱ्यांनी मी अप्रामाणिक आहे, असे म्हणणे हास्यास्पद आहे, अशा शब्दात माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी खा. संजयकाका पाटील यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे भाजपशी अप्रामाणिक असल्याचा व ते राष्ट्रवादीला मदत करीत असल्याचा आरोप खा. संजयकाका पाटील यांनी बुधवारी केला होता. त्यावर घोरपडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ही राष्ट्रवादीच्या मदतीने जिल्हा बँकेची निवडणूक लढविणाऱ्यांनी, मी राष्ट्रवादीच्या भल्यासाठी धडपड करीत असल्याचा आरोप करणे हास्यास्पद आहे. राष्ट्रवादीच्या मदतीने निवडणूक लढविण्याचा प्रकार सुरू करणाऱ्यांना इतरांनी राजकीय सोयीसाठी असे केले तर का झोंबते?ते म्हणाले की, पक्षाशी प्रामाणिक असल्याचा दावा करणाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मदत केली असती तर, मी निवडून आलो असतो. मात्र, मी रडत बसणार नाही. पक्षाशी प्रामाणिक कोण व अप्रामाणिक कोण, हे थोड्याच दिवसांत कळेल. त्यासाठी थांबा व पाहा! पक्षातील अप्रामाणिक कोण आहे, हे भाजपच्या अध्यक्षांना विचारा. ाी अजून बोललेलो नाही, मात्र प्रामाणिकपणाचा दावा करणाऱ्यांनी पक्षाविरोधात केलेली कृत्ये लपणार नाहीत. पक्षात प्रामाणिक व अप्रामाणिक असल्याचे लेबल देण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला?ढालगाव येथील मेळाव्यासाठी मला निमंत्रण दिले आहे की नाही, हे माहीत नाही. मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र म्हैसाळ योजनेचे पाणी सुरू करावे, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. मी सर्वसामान्यांसाठी काम करतो, त्यात कोणीही अडथळा आणू नये, अशी अपेक्षा आहे. मात्र काहीही बोलणाऱ्यांना कोण आवरणार? आम्ही कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवार निवडीची प्रतीक्षा करीत बसलो नाही. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही कवठेमहांकाळ तालुक्यात उमेदवार निवडीबाबत आपल्याला विश्वासात घेतले जाईल, असे वाटत नाही, असेही घोरपडे यांनी सांगितले. (वार्ताहर)