शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तासगावला वेध आरक्षणाचे

By admin | Updated: October 1, 2016 00:20 IST

नगरपालिका निवडणूक : शासनाने मागविली नगरपालिकांकडून माहिती

दत्ता पाटील -- तासगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या परिपत्रकाने स्पष्ट झाले आहे. निवडणूक तोंंडावर आल्याने इच्छुकांना नगराध्यक्ष आरक्षणाचे वेध लागले आहेत. शासनाकडून अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींची लोकसंख्या आणि सध्याच्या आरक्षणाची पडताळणी करण्यात आली आहे. सर्वच नगरपालिकांकडून त्याबाबतची माहिती मागवण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच आरक्षण जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.तासगाव नगरपालिकेत यावेळी नगरसेवकांच्या दोन जागा वाढलेल्या आहेत, तर नगराध्यक्ष पदाची निवड यावेळी नगरसेवकांतून करण्याऐवजी थेट जनतेतून करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. प्रभाग रचना आणि नगरसेवक पदासाठीचे आरक्षण जाहीर झाले आहे. मात्र अद्याप नगराध्यक्ष पदासाठीचे आरक्षण जाहीर झालेले नाही. त्यामुळे निवडणुकीच्या फडात अद्यापही शांतता आहे. पालिकेवर वर्चस्व असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीतील पहिल्या फळीत बहुतांश नेत्यांना नगराध्यक्ष पदाची आशा आहे. त्यामुळे प्रभागात या इच्छुकांचे लक्ष लागत नसल्याचेही चित्र आहे. राज्य शासनाकडून नुकतीच राज्यातील नगरपालिकांकडून विद्यमान आरक्षणाबाबतची माहिती मागविण्यात आलेली आहे. या माहितीबरोबरच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या माहितीबाबतही पडताळणी करण्यात येत आहे. शासनाकडून माहिती मागवण्यात आल्यामुळे शासनपातळीवरुन नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर करण्याबाबत हालचाली सुरु झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लवकरच आरक्षण सोडत जाहीर होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. थेट नगराध्यक्ष : निवड ठरणार डोकेदुखीचतासगाव नगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. मात्र सत्ताधारी भाजप आणि विरोधक राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांत गटबाजी सातत्याने दिसून येत आहे. खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण पडल्यास दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. पालिकेतील राजकीय समीकरणे आरक्षण सोडतीनंतरच स्पष्ट होणार आहेत.अंतिम यादी १५ आॅक्टोबरलाराज्य निवडणूक आयोगामार्फत नगरपालिका निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम सुरु झाला आहे. नगरपालिकेकडून प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. ७ सप्टेंबरपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत, तर प्रभागनिहाय यादी अंतिम करुन १५ आॅक्टोबररोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.