शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

हॉटेल कामगाराचा खून भानामतीच्या संशयातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:22 IST

सांगली : हॉटेल कामगार सुरेश पाष्टे (वय ५०) यांच्या, अत्यंत गुंतागुंत व आव्हानात्मक बनलेल्या खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे ...

सांगली : हॉटेल कामगार सुरेश पाष्टे (वय ५०) यांच्या, अत्यंत गुंतागुंत व आव्हानात्मक बनलेल्या खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला रविवारी पहाटे यश आले. याप्रकरणी मनोज श्रीधर गाडे (४२, रा. रेळेकर प्लॉट, लिमये बंगल्याशेजारी, संजयनगर, सांगली) यास नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथून अटक करण्यात आली. पाष्टे मूळचे कोकणातील होते, ते माझ्या कुटुंबावर करणी व भानामती करतात, असा संशय मला होता, यातूनच त्यांचा खून केल्याची कबुली गाडे याने दिली आहे.अहिल्यादेवी होळकर चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मंगळवार बाजारच्या कॉर्नरवर पाष्टे यांचा शुक्रवारी रात्री चाकूने सपासप तब्बल २८ वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. पाष्टे भारती हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये काम करीत होते. शुक्रवारी कामावरुन ते घरी येत होते. मंगळवार बाजारच्या कॉर्नरवर ते आल्यानंतर गाडे याने त्यांना थांबवून चाकूने हल्ला केला होता. या मार्गावरुन वाहतूक शाखेचे पोलीस नंदकुमार पाटील व इस्लामपूर पोलीस ठाण्यातील दिलीप भगत निघाले होते. ते गर्दी पाहून थांबले. त्यावेळी गाडे हा पाष्टे यांचा गळा चिरत असल्याचे त्यांना दिसले. ते त्यास पकडण्यास गेले, पण दुचाकीच्या हेडलाईटचा प्रकाश पडताच गाडे त्याची दुचाकी घेऊन पळून गेला होता. यावेळी त्याच्या दुचाकीचा क्रमांक त्यांना मिळाला होता. पण अंधार असल्याने त्यांना स्पष्टपणे दिसला नव्हता. केवळ ५२३४ एवढाचा क्रमांक दिसला होता. यावरुन तपासाला दिशा देण्यात आली होती. मात्र काहीच धागेदोरे लागत नव्हते.मृत पाष्टे व गाडे कुटुंबे शेजारीच राहतात. पंधरा वर्षांपूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडण झाले होते. ते एकमेकांशी बोलत नव्हते. त्यानंतर गाडेच्या वडिलांना अर्धांगवायू झाला होता. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आईही नेहमी आजारी पडू लागल्याने अंथरुणाशी खिळून राहायची. काही वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला; पण मूलबाळ होत नव्हते. पाष्टेशी भांडण झाल्यापासून घरची अधोगती सुरू झाली आहे, कोकणातील असल्याने पाष्टे आपल्या कुटुंबावर करणी व भानामती करीत असेल, असा त्यास संशय होता. अलीकडच्या काळात तर हा संशय अधिकच बळावत गेला. त्यामुळे गाडे याने पाष्टे यांना संपविण्याचा निर्णय घेतला. पाष्टे दररोज रात्री कामावरून मंगळवार बाजारमार्गे घरी येतात, याची त्याला माहिती होती. घटनेदिवशी सायंकाळी सहा वाजता तो दुचाकीवरुन (क्र. एमएच १० बीटी-५२३४) घरातून बाहेर पडला. रात्री आठ वाजता तो मंगळवार बाजारच्या कॉर्नरवर अंधारात दबा धरुन बसला होता. रात्री साडेनऊ वाजता पाष्टे सायकलवरुन येताच त्याने त्यांच्यावर हल्ला करून खून केला.पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, दिलीप ढेरे, राजेंद्र कदम, विजय पुजारी, नीलेश कदम, अमित परीट, संजय कांबळे, सुधीर गोरे, युवराज पाटील, बिरोबा नरळे, संदीप गुरव, महादेव धुमाळ, विकास भोसले, शशिकांत जाधव, संदीप पाटील, संदीप नलावडे, सचिन सूर्यवंशी, अमोल क्षीरसागर, दिलीप भगत, नंदकुमार पाटील, सुवर्णा देसाई यांनी तपास केला.खून करून दत्त दर्शनासाठी नृसिंहवाडीतजिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची चार स्वतंत्र पथके स्थापन केली होती. प्रत्येक पथकाला काम वाटून दिले होते. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या पथकास मृत पाष्टे व गाडे यांचे पंधरा वर्षांपूर्वी भांडण झाल्याची माहिती मिळाली. हा धागा पकडून पथकाने तपासाला दिशा दिली. त्याचे घर गाठले. पण तो गायब असल्याची माहिती मिळाली. तो नेहमी अक्कलकोटला स्वामी समर्थ व नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनाला जात असल्याची माहिती मिळाली. या दोन्ही ठिकाणी जाण्याची पथकाने तयारी दर्शविली. प्रथम नृसिंहवाडीत पथक गेले. तिथे मंदिरामध्ये गाडे सापडला. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चाकू जप्त केला आहे.