शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

हाॅटेल नूतनीकरण फी वाढ रद्द करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:25 IST

सांगली : महापालिका क्षेत्रातील हॉटेल व्यावसायिकांच्या नूतनीकरण फीमध्ये महापालिकेने पाच हजार रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ रद्द करावी, ...

सांगली : महापालिका क्षेत्रातील हॉटेल व्यावसायिकांच्या नूतनीकरण फीमध्ये महापालिकेने पाच हजार रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ रद्द करावी, तसेच लॉकडाऊन काळात हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद असताना, पाणी वापर झाला नसल्यामुळे कमीतकमी पाणीपट्टी आकारणीही रद्द करावी, अशी मागणी खाद्यपेय विक्रेता मालक-चालक असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे.

असोसिएशनच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील आणि विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. महापालिका क्षेत्रातील हॉटेल, लॉजिंग, रेस्टोरंट व परमिट रूम बिअरबार व्यावसायिकांना महापूर तसेच कोरोनाच्या संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. यामुळे नूतनीकरणाची पाच हजार रुपये फी वाढ रद्द करावी, हॉटेल व्यावसायिकांना या परवान्यामुळे कोणत्याही वेगळ्या सवलती दिल्या जात नाहीत. हॉटेल परवाना फीमध्ये वाढ करण्यापेक्षा परवानाधारकांची संख्या वाढवून त्यांना परवाना देऊन उत्पन्न वाढ करणे सोयीचे होईल. महापालिकेच्या ठेकेदाराकडून हॉटेलमधील कचरा उठावासाठी व्यवसायिकांना दरमहा वेगळा खर्च करावा लागतो. ठेकेदाराकडून वेळेत कचरा उठाव केला जात नाही. वारंवार दरवाढीची मागणी केली जाते. कोरोना प्रादुर्भावामुळे हॉटेलमधील ग्राहक संख्या ५० टक्के ठेवण्याचे आदेश असल्याने व्यावसायिकांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून हॉटेल व्यावसायिकांना दिलासा देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष लहू भडेकर, उपाध्यक्ष मिलिंद खिलारे आणि सचिव रमेश शेट्‌टी यांच्यासह हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.