शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदासाठी घोडेबाजाराला ऊत

By admin | Updated: June 19, 2015 00:26 IST

जत नगरपालिका : इच्छुकांकडे १५ लाखांपर्यंतची नगरसेवकांची मागणी

जत : जत नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नगरसेवकांचा घोडेबाजार सुरू झाला आहे. एका नगरसेविकेच्या पतीने मतदान करण्यासाठी पंधरा लाख रुपये इच्छुक उमेदवारांकडे मागितले आहेत. यामुळे इच्छुक उमेदवाराचे धाबे दणाणले आहेत.नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सर्वच अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. सत्ताधारी वसंतदादा विकास आघाडीचे आठपैकी सात व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तीनपैकी दोन असे एकूण नऊ नगरसेवक सहलीवर गेले आहेत. सत्ताधारी गटातील नगरसेवक मनोहर पट्टणशेट्टी हे मागील दीड वर्षापासून गंभीर आजारी असल्याने ते घरीच आहेत.नगरपरिषद विरोधी गटनेते परशुराम मोरे यांनी परिवर्तन पॅनेलप्रमुख विक्रम सावंत यांना गाफील ठेवून विरोधी गटातील सहा व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला एक नगरसेवक अशी सातजणांची गोळाबेरीज करून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विरोधी गटातील एक नगरसेवक विक्रम सावंत यांच्यासोबत आहेत व सहलीवर गेलेल्या एका महिला नगरसेवकाच्या मुलाने सावंत यांची भेट घेऊन आम्ही कुठेही जाणार नाही, तुमच्या सोबतच आहे, असे प्रत्यक्ष येऊन सांगितले आहे. त्यामुळे विरोधी गटनेते परशुराम मोरे व माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांनी सुरेश शिंदे यांच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी ठरण्याची शक्यता आहे.आ. विलासराव जगताप यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही. परंतु जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी व शिंदे यांची पालिकेतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी नगरसेवक उमेश सावंत यांना विरोधी परिवर्तन पॅनलच्या कळपात सोडून नगरसेवक श्रीकांत शिंदे व हेमलता चव्हाण यांच्या मोरे यांच्या उमेदवारीस पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते. ही योजना अंमलात येण्यापूर्वीच शिंदे यांनी श्रीकांत शिंदे व चव्हाण या दोन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना घेऊन सहलीवर पाठविले आहे. (वार्ताहर)परिवर्तन पॅनेलप्रमुख विक्रम सावंत व आमच्यात मतभेद नाहीत, त्यांचे काही नगरसेवक सोबत घेऊन आम्ही नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणुकीप्रमाणे आगामी बाजार समिती निवडणुकीत आम्ही एकत्र राहणार आहे.- सुरेश शिंदेमाजी सभापती, बाजार समितीनगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष हा सत्ताधारी वसंतदादा विकास आघाडीचाच होणार आहे. नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून माझ्यात व सुरेश शिंदे यांच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न विरोधकांनी फोडा-फोडीचे राजकारण करून केला आहे. त्यांचा तो प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. - विक्रम सावंतजिल्हा बॅँक, संचालककॉँग्रेस जिल्हाध्यक्षांचे प्रयत्न अयशस्वीसांगली जिल्हा कॉँग्रेस कमिटी अध्यक्ष मोहनराव कदम यांनी परिवर्तन पॅनेलमधून नाराज होऊन बाहेर गेलेले व उमेदवारी अर्ज दाखल केलेले नगरपरिषद विरोधी गटनेते परशुराम मोरे यांची जत येथे येऊन भेट घेतली व उमेदवारी पाठीमागे घेण्यासाठी विनंती केली आहे. परंतु त्यांची विनंती त्यांनी मान्य केली नाही.