कासेगाव : जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी बापूंना चांगल्या-वाईट काळात मोलाची साथ दिली आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. भविष्यात आपले ऋणानुबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न राहील, अशी भावना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
कासेगाव येथील राजारामबापू पाटील यांच्या ‘पदयात्री’ स्मारकामध्ये बापूंसमवेत काम केलेल्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा आणि जे हयात नाहीत, त्यांच्या वारसांचा पाटील यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. आ. मानसिंगराव नाईक, आ. अमोल मिटकरी, माजी आमदार सदाशिवराव पाटील, विलासराव जगताप, विश्वासराव पाटील, दिलीपतात्या पाटील, माणिकराव पाटील, प्रा. श्यामराव पाटील, जनार्दनकाका पाटील, युवा नेते प्रतीक पाटील उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, ‘आपण आपापल्या भागात ताकदीने काम करीत बापूंना साथ दिली आहे. काही कार्यकर्त्यांनी नव्वदी ओलांडली आहे, काही कार्यकर्ते हयात नाहीत, त्यांच्या कुटुंबातील दुसरी, तिसरी पिढी पुढे आली आहे. आम्हाला जितके शक्य आहे, त्याप्रमाणे आपला सन्मान केला आहे. यातूनही काही मंडळी राहिली असतील, तर त्यांचाही सन्मान करू. ’
माजी आमदार शरद पाटील, माजी आमदार सदाशिवराव पाटील, बसवराज पाटील, अविनाश पाटील, अॅड.बाबासाहेब मुळीक, रावसाहेब पाटील, अॅड. चन्नाप्पा होर्तीकर, लालासाहेब यादव, रवींद्र बर्डे, माजी महापौर इद्रिस नायकवडी, श्रीमती अनिता सगरे, साहेबराव गायकवाड (डफळापूर), आबासाहेब देशमुख (माहुली), तमन्नगौंडा रवी पाटील (जत), जयसिंग शिंदे (शिराळा), मयुरेश पत्की (सांगली) यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते व त्यांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला.
निमंत्रक प्रा. श्यामराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी पी. आर. पाटील, श्यामराव पाटील (काका), आर. डी. सावंत, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, अॅड. चिमण डांगे, देवराज पाटील, आटपाडीचे आनंदराव पाटील, हणमंतराव देशमुख उपस्थित होते.
फोटो ओळी- १९०१२०२१-पदयात्री न्यूज : कासेगाव येथे राजारामबापूंच्या सहकाऱ्यांचा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी अॅड. बाबासाहेब मुळीक उपस्थित होते.