लिंगनूर : रॉयल ऑफिसर्स प्रीपरेटरी अकॅडमीच्या प्राचार्य गीतांजली शहाजीराव शिंदे यांना तमिळनाडूतील इंडियन एम्पायर युनिव्हर्सिटीने सामाजिक सेवा व शिक्षण या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मानद डॉक्टरेट ही पदवी देऊन सन्मानित केले आहे.
प्राचार्य गीतांजली शिंदे या बारा वर्षे रॉयल ऑफिसर्स प्रीपरेटरी अकॅडमी, ज्युनिअर कॉलेज, खंडेराजुरी येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिक्षण व करिअरबाबत मार्गदर्शन केले. त्या शिक्षण क्षेत्राबरोबरच पर्यावरण, सामाजिक क्षेत्र व महिला सबलीकरणासाठी कार्यरत आहेत. एकलव्य अकॅडमीचे अध्यक्ष शहाजी शिंदे व प्राचार्य गीतांजली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासन, राज्य शासन व विविध महामंडळे यामध्ये अनेक विद्यार्थी अधिकारी पदांवर काम करत आहेत.