शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच, उपसरपंचांना मानधन, सदस्यांच्या पदरी फक्त चहापान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:31 IST

सांगली : गावगाड्याची सूत्रे हाती घेऊन विकासाच्या वाटेवर गावाला नेण्याचे नियोजन करणाऱ्या कारभाऱ्यांचीच सध्या आर्थिक कुचंबना होऊ लागली आहे. ...

सांगली : गावगाड्याची सूत्रे हाती घेऊन विकासाच्या वाटेवर गावाला नेण्याचे नियोजन करणाऱ्या कारभाऱ्यांचीच सध्या आर्थिक कुचंबना होऊ लागली आहे. सरपंच, उपसरपंचांना तुटपुंजे मानधन, तर सदस्यांना केवळ चहापानावरच समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या मानधनवाढीबरोबरच सदस्यांनाही मानधन सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

गावगाड्याचे कारभारी म्हणून काम करताना सरपंच, उपसरपंचांना काहीप्रमाणात मानधन मिळते. सदस्यांना मात्र कोणत्याही मानधनाशिवाय काम करावे लागते. दिवसातील बराचसा वेळ गावासाठी देऊनही त्यांच्या पदरी केवळ चहापान येतो. त्यामुळे निवडणुकीतील विजयाच्या उत्साहावर आर्थिक अडचणींमुळे पाणी पडते. सामान्य कुटुंबातून आलेल्या सदस्यांची सर्वाधिक कुचंबना होत असल्याचे दिसून येत आहे. सदस्यांना किमान मानधन मिळाले तर गावाचा गाडा हाकताना त्यांना अधिक बळ मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे. अखिल भारतीय सरपंच परिषदेमार्फत गेल्या अनेक दिवसांपासून या प्रश्नावर शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. त्याला अद्याप यश मिळाले नाही.

कोट

गावासाठी जितका वेळ ग्रामसेवक देतात, त्याहून अधिक वेळ पदाधिकारी व सरपंच देत असतात. त्यामुळे ग्रामसेवकाच्या पगाराएवढे सरपंचांना मानधन, त्याखालोखाल उपसरपंच व सदस्यांना मानधन मिळाले पाहिजे.

-प्रदीप माने, सरपंच, सावर्डे, ता. तासगाव

कोट

सरपंच, उपसरपंचांचे मानधन तर वाढले पाहिजेच, मात्र सदस्यांनाही दिले पाहिजे. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांनाही यापेक्षा अधिक रोजंदारी मिळते. त्यामुळे शासनाने याचा विचार करावा.

- राणी नागरगोजे, सरपंच, नरवाड, ता. मिरज

कोट

कामांची जबाबदारी केवळ सरपंच, उपसरपंच सांभाळू शकत नाहीत, तर सदस्यांनीही एकत्रित काम करायला हवे. त्यामुळे सदस्यांनाही भरीव मानधन मिळायला हवे. सरपंचांच्याही मानधनात वाढ व्हावी.

सुरेखा नाईक, सरपंच, आरग

चौकट

निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती १५२

निवडून आलेले सदस्य १५०८

निवडून आलेले सरपंच १११