शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

महापुराबाबत जलसंपदा मंत्र्यांचा गृहपाठ कच्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:24 IST

सांगली : कृष्णा, वारणा नदीच्या महापुराचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असे म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगलीकरांना आश्‍वस्त ...

सांगली : कृष्णा, वारणा नदीच्या महापुराचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असे म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगलीकरांना आश्‍वस्त केले होते. मात्र, त्यांचा महापुराबाबतचा गृहपाठ कच्चा राहिला. महापुराऐवजी सांगलीकरांचाच करेक्ट कार्यक्रम झाला. जलसंपदा मंत्र्यांनी या महापुराच्या नियंत्रणात आलेल्या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून दुसरे खाते घ्यावे, अशी टीका सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी केली.

ते म्हणाले, मंत्री पाटील यांनी पाणी पातळी ४८ फुटांपेक्षा अधिक होणार नाही, अशी ग्वाही दिली होती. त्यांचा पक्का अभ्यास असावा. पाटबंधारे विभागानेही ५२ फुटांपर्यंत पाणी जाईल, असे सांगितले. त्यामुळे काही भागातील लोक निर्धास्त होते. परंतु, सांगलीत महापुराचे पाणी ५५ फुटांपर्यंत वाढले. २०१९च्या महापुरातून धडा घेत हजारो लोक घर सोडून सुरक्षितस्थळी गेले. अन्यथा जलसंपदा विभागाच्या माहितीवर विश्‍वास ठेवला असता तर अडचण झाली असती. पाटील यांनी सांगलीत तळ ठोकायला हवा होता. कोरोना आणि महापूर या दोन्ही संकटात पालकमंत्री म्हणून त्यांनी काय जबाबदारी पार पाडली, याचा हिशेब जनतेला दिला पाहिजे.

महापुराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. सांगली शहरासह जिल्ह्यातील नव्वदहून अधिक गावे बाधित झाली आहेत. राज्य शासनाने तातडीची आणि अधिक मदत जाहीर करून ती तत्काळ हातात येईल, अशी व्यवस्था करावी. आरोग्याच्या सुविधा मोफत पुरवाव्यात. मदत जाहीर करताना घरात किती पाणी होते, याचे फूटपट्टी घेऊन मोजमाप करण्याची गरज नाही. पुराचे पाणी आलेल्या भागात सरसकट मदत द्यावी. व्यापाऱ्यांना सानुग्रह अनुदान द्यावे. छोट्या व्यापाऱ्यांनाही मदत जाहीर करावी, अशी मागणी पवार यांनी केली.