एका शासकीय कर्मचाऱ्यांच्या संस्थेची लवकरच निवडणूक होणार आहे. या संस्थेला नावारूपाला आणणारे पदाधिकारी राहिले बाजूला आणि एक स्वयंभू नेतृत्व उदयास येऊ लागले आहे. ते महाशय संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनाही काहीच सुचू देत नाहीत. संस्थेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही मीच नेता असल्याचे ठासून सांगत आहेत. मी नेता म्हणून नेता होत नाही, तर स्वकर्तृत्वावर होणारे नेतृत्वच कायमस्वरूपी टिकते. पण, सध्या एका संस्थेतील संचालकास नेता होण्याचे डोहाळे लागल्याचे दिसत आहे. प्रत्येक ठिकाणी या महाशयांची लुडबुड दिसत आहे. नेतेगिरीच्या नादात हे महाशय वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा अपमान करण्यातही मागे राहात नाहीत. या स्वयंघोषित नेतृत्वाचा एकूणच कारभार ‘चार हाणा, पण मला साहेब म्हणा’ असाच सुरू आहे. दाेन दिवसांपूर्वी काही सभासदांमध्ये ‘संस्था बुडण्याआधी कुणीतरी आवरा रे या उगवत्या नेतृत्वाला,’ अशी चर्चा रंगली हाेती.
जोड्याने हाणा; पण, मला साहेब म्हणा..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:30 IST