शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणगाव बुद्रुकची खाऊची पाने सातासमुद्रापार

By admin | Updated: July 12, 2014 00:19 IST

दिल्ली, युरोपमधून मागणी : क्षेत्र मात्र घटले; पुणे, मुंबई, चेन्नईतही पुरवठा

रजाअली पिरजादे - शाळगावकडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक येथील खाऊची पाने दिल्ली आणि युरोपला जाऊ लागली आहेत. एकेकाळी हिंगणगाव येथील खाऊची पाने संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होती. त्यावेळी या परिसरात सुमारे ७५ ते १०० एकर पानमळ्याचे क्षेत्र होते. हिंगणगाव, चिखली, येडे, उपाळे या गावांतून पानमळे दिसत. सर्वाधिक पानमळे हिंगणगाव बुद्रुक येथे होते. मात्र १९७२ मध्ये दुष्काळ पडला आणि पानमळ्यांची संख्या हळूहळू कमी झाली. सध्या या भागात केवळ २० ते २५ एकर पानमळे असतील. अलीकडे पानमळे असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा चांगले दिवस आले आहेत. कारण येथील खाऊची पाने आता दिल्ली आणि युरोपकडे रवाना होऊ लागली आहेत. दिल्ली-युरोपमध्ये ‘देशी पान’ म्हणून येथील पानाला लोकप्रियता प्राप्त झाली आहे. याशिवाय येथील पानांना पुणे, मुंबई, चेन्नई येथेही चांगली मागणी आहे. हिंगणगाव तलावात आता टेंभूचे पाणी दाखल झाले आहे. त्यामुळे पानमळ्यांना संजीवनी मिळाली असली तरी, अधिकतर शेतकरी ऊसपिकाकडे वळले आहेत. पानमळ्याला अधिक मेहनत घ्यावी लागते. मळ्यात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे पानमळ्यांची संख्या म्हणावी तशी वाढलेली दिसून येत नाही. एकदा पानमळा लावला, तर तो १५ ते २० वर्षे राहतो. बारमाही उत्पन्न मिळते. एकरी सुमारे तीन लाख रुपये खर्च येतो, तर दहा ते बारा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. याबाबत पानमळ्याचे मालक संजय यादव म्हणाले की, १५ ते २० वर्षांपूर्वी गावात मोठ्या प्रमाणात पानमळे होते. जुन्या काळातील लोक हौसेने पान खात. प्रत्येकाकडे पानाची चंची दिसत असे. शरीरातील रक्ताला, पचनक्रियेला पानाचा फायदा होतो, असे बोलले जात असे. आता मावा, गुटख्याकडे कल दिसतो. आमचे पान देशी पान म्हणून प्रसिध्द आहे. पूर्वी मुस्लिम घराण्यांत पान खाण्याची परंपरा होती. बदलत्या काळानुसार पान खाणाऱ्यांची संख्या कमी झाली असली तरीही,अजून पानाला मोठी मागणी आहे.